तीन सामन्यीं टी-20 मालिका 2-1 फरकाने न्यूझीलंडकडे ः टीम सेफर्ट सामनावीर व मालिकवीर पुरस्कारा मानकरी
वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
शनिवारी झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात यजमान न्यूझीलंडने श्रीलंकेलवर थरारक विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने न्यूझीलंडला विजयासाठी 183 धावांचे आव्हान दिले. यानंतर न्यूझीलंडने हे आव्हान 1 चेंडूआधी पूर्ण करत सामना जिंकला. न्यूझीलंडने 6 गडी गमावत 19.5 षटकांत 183 धावा केल्या. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशा फरकाने मालिकाही जिंकली. टीम सेफर्ट हा न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
प्रारंभी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावत 182 धावा केल्या. लंकेकडून कुसल मेंडिसने 73 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याने 48 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 73 धावा केल्या. कुसल परेराने 33 धावांची खेळी केली. निशंकाने 25 तर धनंजया डी सिल्वाने 20 धावांचे योगदान दिले तर असलंका 3 रन्सवर धावबाद झाला. वानिंदु हसरंगा आणि एम तिक्षणा श्न्यावर नाबाद परतले. न्यूझीलंडकडून बेन लिस्टर याने 2 फलंदाजाना तंबूचा रस्ता दाखवल तर अॅडम मिल्ने आणि ईश सोधी या दोघांनी एक-एक गडी बाद केला.
टीम सेफर्टचे तुफानी अर्धशतक
विजयासाठीचे 183 धावांचे लक्ष्य किवीज संघाने 19.5 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. या विजयासह त्यांनी तीन सामन्यांची टी-20 मालिकाही जिंकली. सलामीवीर टीम सेफर्टने शानदार खेळी साकारताना 48 चेंडूत 10 चौकार व 3 षटकारासह 88 धावांची खेळी साकारत विजयात मोलाची भूमिका बजावली. कर्णधार टॉम लॅथमने 31 धावा करत त्याला चांगली साथ दिली. याशिवाय, चाड बोवेस याने 18, मार्क चॅपमॅनने 16 आणि डेरेल मिचेल याने 15 धावांचे योगदान दिले. तर जेम्स निशमला भोपळाही फोडता आला नाही. रचिन रविंद्र याने नाबाद 2 धावा केल्या. तर एडम मिल्ने हा शून्यावर नाबाद परतला. श्रीलंकेकडून लहिरु कुमारा याने सर्वाधिक 3 बळी मिळवले. तर महिश तिक्षणा आणि प्रमोद मदुशन या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक : श्रीलंका 20 षटकांत 6 बाद 182 (कुसल मेंडिस 73, कुसल परेरा 33, निशंका 25, धनजंय डी सिल्वा 20, बेन लिस्टर 25 धावांत 2 बळी, अॅडम मिल्ने व ईश सोधी प्रत्येकी 1 बळी)
न्यूझीलंड 19.5 षटकांत 6 बाद 183 (टीम सेफर्ट 88, टॉम लॅथम 31, चॅड बाऊस 17, मार्क चॅपमॅन 16, डेरेल मिचेल 15).

खासगी विमानाची मैदानावरुन भरारी
न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्या दरम्यान तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना क्विन्सलॅंड येथे खेळला गेला. या सामन्यादरम्यान एक अशी घटना घडली ज्यामुळे सर्वजण हैराण राहिले. चालू सामन्यादरम्यान मैदानाच्या अत्यंत जवळून प्रायव्हेट प्लेन गेल्याने सर्वजण चकीत झाले. हा सामना सुरू असताना श्रीलंका प्रथम फलंदाजी करत होती. त्यावेळी मैदानाच्या वरून अगदी कमी अंतरावरून एक प्रायव्हेट प्लेन गेले. त्यामुळे काही क्षण चाहते हैराण झाले. यानंतर न्यूझीलंडचा डाव सुरू असताना देखील अशाच प्रकारे विमानाने उ•ाण भरले. क्विन्सलॅंड येथील सर जॉन डेव्हिस मैदानाच्या अगदी जवळच विमानतळ उभारण्यात आले आहे. या ठिकाणी अनेक प्रायव्हेट जेट उतरत असतात. त्यामुळे या मैदानावर हे नजारे अनेकदा पाहायला भेटतात.









