नवीन वर्ष सुरू झाले की काही जण आपल्या आयुष्यात सुधार आणण्यासाठी नवनवीन संकल्प करतात. काही धूम्रपान सोडण्याचा निश्चय करतात, काही मद्यपान न करण्याचा निश्चय करतात, काही आपल्या व्यवसायामध्ये उत्पन्न वाढविण्याचा निश्चय करतात, काही जण प्रतिदिन व्यायाम करण्याचा निश्चय करतात. अशा प्रकारे अनेक जण अनेक प्रकारे ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे आणि जीवनामध्ये ज्याची कमतरता वाटते ते भरून काढण्याचा निश्चय करतात. पण काही दिवसातच बहुतेक जणांचे निश्चय बर्फासारखे वितळून जातात. काही वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राने त्याच्या जीवनातील नवीन वर्षाच्या निश्चयाचा एक किस्सा सांगितला. तो जेव्हा दररोज व्यायाम करण्याचा निश्चय करून आधुनिक व्यायाम यंत्रे असलेल्या व्यायामशाळेत गेला तेव्हा व्यायामशाळेच्या चालकाने त्याला सांगितले की व्यायामशाळेतील सर्व वेळा अगोदरच भरलेल्या आहेत, त्यामुळे नवीन व्यक्तींना जागा नाही, तुम्ही आठ दिवसांनी पुन्हा प्रयत्न करा. माझ्या मित्राने आश्चर्य व्यक्त करत प्रश्न केला की आज जर जागा नाही तर आठ दिवसांनी कशी काय जागा रिकामी होणार? व्यायामशाळेच्या चालकाने मजेशीर उत्तर देत सांगितले, अहो, आज नवीन वर्षाची सुरुवात झाली ना! म्हणून लोकांच्या मनामध्ये उत्साह आहे, हळूहळू आठच दिवसात तो मावळून जाईल मग तुम्हाला जागा मिळेल! यातील विनोदाचा भाग सोडला तर वस्तुस्थिती सत्य आहे.
आपण जेव्हा निश्चय करतो तेव्हा तो पालन करण्याची दृढता आपल्याकडे असत नाही याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात शिस्त आणि मनावर नियंत्रण नसते. आपल्याला शरीरावर आणि मनावर जर नियंत्रण मिळवायचे असेल तर आपल्या शरीराची रचना समजून घेतली पाहिजे. भगवान श्रीकृष्ण भगवद् गीतेमध्ये सांगतात (भ गी 3.42) इन्दियाणि पराण्याहुरिन्दियेभ्यः परं मनः । मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः । अर्थात ‘कार्य करणारी इंद्रिये जड प्रकृतीपेक्षा श्रे÷ आहेत, मन इंद्रियापेक्षा श्रे÷ आहे, बुद्धी मनापेक्षाही श्रे÷ आहे आणि तो (आत्मा) बुद्धीपेक्षाही श्रे÷ आहे.’
आपले शरीर हे तीन भागामध्ये विस्तारलेले आहे. आपण जे पाहतो ते जड शरीर पृथ्वी, जल, अग्नि, वायू आणि आकाश या प्रकृतीतील पंचमहाभूतांनी बनलेले आहे. असे जड शरीर हे त्यामधील सूक्ष्म शरीर मन, बुद्धी आणि अहंकार यांनी नियंत्रित केले जाते. हे जड आणि सूक्ष्म शरीर सत-चित-आनंद आत्म्यावरील भौतिक आवरण आहे. आपण अज्ञानामध्ये असल्याने आपल्याला वाटते की शरीर म्हणजेच सर्व काही आहे, पण ह्या श्लोकामध्ये वर्णन येते की जड इंद्रियांपेक्षा (भौतिक शरीरापेक्षा) मन श्रे÷ आहे आणि मनापेक्षा बुद्धी श्रे÷ आहे आणि बुद्धी ही आपल्या अहंकाराप्रमाणे चालते पण ह्या सर्वांपेक्षाही सत-चित-आनंद शरीर म्हणजे आत्मा श्रे÷ आहे. याचा अर्थ हा आहे की शरीरावर जर नियंत्रण आणावयाचे असेल तर मनावर नियंत्रण असले पाहिजे, मनावर नियंत्रण आणावयाचे असेल तर आध्यात्मिक बुद्धीचा वापर केला पाहिजे, बुद्धी ही आपण स्वतःला कोण समजतो त्याप्रमाणे चालते. या अवस्थेला अहंकार म्हणतात. कारण हाच अहंकार आपल्या मूळ शरीराला म्हणजे ‘आत्मा’ ला विसरतो. म्हणून जो ‘आत्मस्थितीवर’ नाही त्याला मनावर आणि शरीरावर नियंत्रण आणणे शक्मय नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात (भ गी 3.43) एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना। जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् । अर्थात ‘याप्रमाणे आपण स्वतः, भौतिक इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा श्रे÷ आहोत असे जाणून, हे महाबाहो अर्जुन! मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे मनाला स्थिर केले पाहिजे आणि याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे. ‘मनुष्या’ने आत्मस्थितीवर कार्य केल्यास बुद्धीला आणि इंद्रियांना शिस्त आणि नियमन करण्याचे आध्यात्मिक बळ प्राप्त होते. जीवनाच्या भौतिक अस्तित्वामध्ये मनुष्य निश्चितपणे कामप्रवृत्ती आणि भौतिक प्रकृतीच्या साधनावर स्वामित्व गाजविण्याच्या इच्छेने प्रभावित होतो. सर्वांवर स्वामित्व गाजविण्याची आणि इंद्रियतृप्ती करण्याची इच्छा म्हणजे बद्ध जीवांचा शत्रूच आहे. परंतु आपली भावना शुद्ध म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या स्मरणाने मनुष्य भौतिक इंद्रिये मन आणि बुद्धी नियंत्रित करू शकतो. मनुष्य आपल्या विहित कर्माचा त्याग करू शकत नाही पण भौतिक मन आणि इंद्रिये यापासून प्रभावित न होता स्वतःच्या विशुद्ध अर्थात सत-चित-आनंद स्वरूपावर स्थित झालेल्या बुद्धीद्वारे, क्रमशः कृष्णभावनेचा विकास करून कालांतराने मनुष्य दिव्य स्थितीमध्ये स्थिर होऊ शकतो. कृत्रिमरित्या मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केल्यास बहुतांश वेळा तो असफलच होतो.
वाईट गोष्टीवर नियंत्रण करावयाचे असल्यास त्याला चांगल्या गोष्टीने परिवर्तित केल्याशिवाय त्यामध्ये बदल होऊ शकत नाही. यासाठी भगवान श्रीकृष्ण सांगतात (भ गी 2.59) विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः । रसवर्जं रसो।़प्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते। अर्थात ‘देहधारी जीवात्मा जरी इंद्रियभोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रियविषयाबद्दलची गोडी राहतेच, परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्ये थांबविल्यास मनुष्य उच्च चेतनेमध्ये स्थिर होतो.’ मनुष्य जोपर्यंत दिव्य स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत तो इंद्रियतृप्तीपासून पूर्णपणे परावृत्त होऊ शकत नाही. येथे दिव्य स्तर म्हणजे आपली मूळ भावना अर्थात कृष्णभावना. दुसऱया शब्दात सांगायचे तर जोपर्यंत मनुष्य भगवान श्रीकृष्णाच्या सेवेमधील आनंद प्राप्त करीत नाही तोपर्यंत तो या भौतिक जगातील नश्वर अथवा तात्पुरत्या आनंदाच्या अनुभवातून बाहेर येऊ शकत नाही. म्हणून आपल्याला इंद्रिये आणि मन नियंत्रित करावयाची असल्यास त्यांना भगवान श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये लावण्याचा मनुष्याने प्रयत्न केला पाहिजे. यासाठी भगवान श्रीकृष्ण जे आपली इंद्रिये आणि मन नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना चेतावणी देतात. (भ गी 2.60) यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः । इन्दियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः । अर्थात ‘इंद्रिये इतकी प्रबळ आणि उत्शृंखल आहेत की, हे अर्जुन! इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱया विवेकी पुरुषाच्या मनालासुद्धा बळजबरीने ओढून नेतात.’ आपण समाजामध्ये पाहतो की असे अनेक विद्वान ऋषी, तत्त्वज्ञानी आणि तथाकथित आध्यात्मवादी आहेत, जे इंद्रियांवर विजय मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांच्या दृढ प्रयत्नांनीही त्यांच्यातील सर्वात श्रे÷ अशी व्यक्तीही क्षुब्ध मनामुळे भौतिक इंद्रियोपभोगाला कधीकधी बळी पडते. म्हणून पूर्णपणे कृष्णभावनाभावित झाल्याशिवाय मन आणि इंद्रियांना नियंत्रित करणे अत्यंत कठीण आहे. मनाला श्रीकृष्णांच्या ठायी पूर्णपणे रममाण केल्याशिवाय भौतिक कार्यांमधून निवृत्त होणे मनुष्याला अशक्मयप्राय आहे. कृष्णभावना ही इतकी दिव्य गोष्ट आहे की, भौतिक उपभोगाबद्दलची रुची आपोआपच नष्ट होते. एखाद्या भुकेल्या मनुष्याने भरपूर पौष्टिक अन्नपदार्थ खाऊन आपली भूक भागविल्याप्रमाणे ही हरिभक्ती आहे. अशा व्यक्तींना स्थितप्रज्ञ असे म्हटले आहे. भगवद्गीता अशा व्यक्तीबद्दल वर्णन करताना म्हणते (भ गी 2.61) तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः । वशे हि यस्येन्दियाणि तस्य प्रज्ञा प्रति÷िता । अर्थात ‘जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचे संयमन करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये दृढपणे स्थिर करतो त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य असे म्हटले जाते. ‘मन आणि इंद्रियावर विजय मिळविण्यासाठी हरिभक्तीमध्ये मन लावणे हा सर्वात सोपा आणि निश्चित असा उपाय आहे असे भगवद्गीता
सांगते.
या जगामध्ये आपल्याला सर्वसामान्यपणे शिकविले जाते की ‘तुमच्या मनाला येईल तसे वागा’ आणि हा सल्ला लोकांना फार आवडतो, कारण मनाचे ऐकून मिळणारा इंद्रियतृप्तीचा आनंद आणि समाधानाचे अनंत काळापर्यंत होणारे दुष्परिणाम आपल्याला अज्ञानामुळे दिसून येत नाहीत. यासाठी तुकाराम महाराज म्हणतात. होऊ नको काही या मना आधीन । नाइके वचन यांचे काही ।।1।। हटियाची गोष्टी मोडुनी टाकावी । सोई हि धरावी विठोबाची ।।2।। आपुले अधीन करुनिया ठेवा । नाही तरी जीवा घातक हे ।।3।। तुका म्हणे झाले जे मना आधीन । तयासी बंधन यम करी ।।4।। अर्थात ‘काही झाले तरी आपल्या मनाच्या स्वाधीन राहू नका. या मनाने काहीही सांगितले तरी अजिबात ऐकू नका. हे मन मोठे हट्टी आहे याला विठोबाच्या चिंतनात लावावे हेच योग्य आहे. आपल्या मनाला आपल्या स्वाधीन करून ठेवा, नाहीतर हे मन निश्चितच जीवाचा घात करील. तुकाराम महाराज म्हणतात, जे लोक मनाच्या स्वाधीन झाले, त्यांना यमाचे फार मोठे बंधन सहन करावे लागते.’
– वृंदावनदास








