कोल्हापूर
प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘जागतिक ध्यान दिन’ उत्साहात संपन्न झाला. प्रमुख पाहुणे आर्ट ऑफ लिव्हींगच्या ऐश्वर्या पाटील यांचे स्वागत करण्यात आले. ध्यान केल्याने मनाला शांती मिळते आणि तणाव कमी होतो. त्यामुळे लक्ष आणि एकाग्रता देखील वाढते. निरोगी आरोग्यासाठी ध्यान करणे गरजेचे आहे. दररोज योगा आणि ध्यान केल्याने शरीर आणि मन संतुलित राहते आणि शरीरात नेहमी ऊर्जा राहते. प्राचार्य रविंद्र कुंभार यांनी मार्गदर्शन लाभले. प्रा. वैष्णवी निवेकर, प्रा. निकिता शेटे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रा. वैष्णवी निवेकर यांनी मानले. यावेळी प्रा. पियुषा नेजदार, प्रा. दिव्या शिर्के, प्रा. सुप्रिया अजेटराव आदी उपस्थित होत्या.
Previous Articleमंत्री नितेश राणे यांचे खारेपाटण येथे जल्लोषात भव्य स्वागत
Next Article माजी सैनिक गजानन तेंडुलकर यांचे निधन








