प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्रातर्फे ‘शुक्रतारा मंद वारा’ या गाजलेल्या गीताच्या 60 व्या वर्षाच्या पदार्पणानिमित्त ‘नवा शुक्रतारा’ हा काव्यात्मक कार्यक्रम शनिवार दि. 30 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता लोकमान्य रंगमंदिर येथे होणार आहे. नव्या ओढीचा, नव्या गोडीचा, नव्या पिढीचा, ‘नवा शुक्रतारा’ मध्ये अरुण दाते यांच्या सुमधुर गीतांची ‘स्वरगंगा’ अनुभवता येणार आहे.
या कार्यक्रमामध्ये गायक व संगीतकार मंदार आपटे, गायिका मनीषा निश्चल यांचा सहभाग असून याची निर्मिती आणि दिग्दर्शन अतुल अरुण दाते यांची आहे. संगीताची बाजू विष्णू शिरोडकर सांभाळणार असून अनिकेत दड्डीकर, प्रकाश पेडणेकर व सुरजित यांचा सुद्धा या कार्यक्रमात सहभाग आहे.
कार्यक्रम विनामूल्य असला तरी अतिथी प्रवेशिकेशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. एका प्रवेशिकेवर एकाच व्यक्तीस प्रवेश मिळेल. अतिथी प्रवेशिका लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीचे मुख्यालय, गुरुवारपेठ, टिळकवाडी, लोकमान्य रंगमंदिर बेळगाव येथे उपलब्ध आहेत.