न्हावेली / वार्ताहर
ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कार्यालयात झालेल्या वीज वितरण अधिकाऱ्यांच्या बैठकीत शब्द उपकार्यकारी अभियंता वाघमोडे यांनी मळेवाड नाईकवाडी येथे आज ट्रान्सफॉर्मर बसवून देतो असे दिलेले आश्वासन पूर्ण करत वाघमोडे यांनी आपला शब्द पाळला आहे.मळेवाड नाईकवाडी येथील ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड असल्याने नाईकवाडी परिसरातील ग्राहकांना लो होल्टेजची समस्या गेले कित्येक दिवस भेडसावत होती.तसेच विजेच्या अनेक समस्या ग्राहकांना असल्याने मंगळवारी मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत कार्यालयात वीज वितरण अधिकारी व ग्राहक अशी एकत्रित बैठक ग्रामपंचायतकडून आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत ग्राहकांनी नाईकवाडी येथील ट्रान्सफॉर्मर बाबत असलेली समस्या उपकार्यकारी अभियंता वाघमोठे यांच्यासमोर मांडले असता त्यांनी बुधवारी आपण ट्रान्सफॉर्मर नव्याने बसवून देतो असे आश्वासन दिले होते.
आज सदरचा नाईकवाडी येथे ट्रान्सफॉर्मर बसवल्याने वाघमोडे यांनी काल बैठकीत दिलेला शब्द पूर्ण करत आपला शब्द पाळल्याने बैठकीचे फलित झाले असल्याचे ग्राहकातून समाधान व्यक्त केले जात असून इतरही समस्या बाबत वाघमोठे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करावे अशी मागणी ग्राहक वर्गातुन केली जात आहे









