प्रतिनिधी,रत्नागिरी
Ratnagiri News : एसटीच्या नव्या गाड्या प्रवाशांसाठी डोकेदूखी ठरताहेत.नवीन कोऱ्या घेतलेल्या या गाड्या रस्त्यात बंद पडत असल्याने प्रवाशांना मनस्ताप होत आहे.या कंत्राटी स्वरुपात घेतलेल्या गाड्यांची जबाबदारी आता नेमकी कुणाची आहे असा सवाल उपस्थित होत आहे. मोठा गाजावाजा करत सहा महीन्यापुर्वी रत्नागिरीत डेपोत 22 गाड्या दाखल करण्यात आल्या होत्या.या गाड्या पैकी रत्नागिरी – मुंबई सेंट्रल गाडी मध्यरात्री महामार्गावर संगमेश्वर मध्ये बंद पडली. यामुळे तब्बल साडेतीन तास मुंबई – गोवा महामार्गावर प्रवाशांचा अंधारात खोळंबा झाला.
रत्नागिरीतून दुसरी गाडी आल्यानंतर प्रवासी मुंबईकडे रवाना झाले.सहा महीन्यातच गाड्या रस्त्यावर बंद पडू लागल्यानं या नवीन गाड्या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.









