पुणे / प्रतिनिधी :
बाथरूममध्ये पडल्यामुळे जवळपास दोन महिन्यांपासून अंथरुणाला खिळलेल्या 84 वर्षीय महिलेवर ‘रूट ब्लॉक आणि स्पंदित रेडिओफ्रीक्वेंन्सी प्रक्रियेसह वर्टेब्रोप्लास्टी उपचार केल्याने या महिलेला मूलभूत कामांसाठी इतरांवर अवलंबून रहावे लागत नाही.
पडल्यामुळे या महिलेच्या मणक्याचे फ्रॅक्चर झाले होते. पाठदुखीच्या तीव्र वेदना आणि चकती फुगल्यामुळे तिच्या पायातील मज्जातंतूंच्या मुळांना संकुचित केले गेले, ज्यामुळे खूप जास्त प्रमाणात वेदना जाणवत होत्या. त्यामुळे त्यांच्यावर ‘रूट ब्लॉक आणि स्पंदित रेडिओफ्रीक्वेंन्सी प्रक्रियेसह वर्टेब्रोप्लास्टी करण्यात आली. यानंतर त्या आपल्या दैनंदिन कामे पूर्वीसारखी करू लागल्या आहेत.
या उपचार पद्धतीबाबत माहिती देताना पेनेक्स क्लिनिकचे डॉ. काशिनाथ बांगर म्हणाले, या प्रक्रियेच्या यशाने आम्ही सुद्धा आनंदी आहोत. या उपचार पद्धतीमुळे रुग्णाला संपूर्णपणे आराम मिळातो. रुग्ण स्वतंत्रपणे बसू शकले आणि पुन्हा एकदा चालू शकले, रुग्णाचे आयुष्य पूर्वीप्रमाणे होऊ शकेल. हे उपचार रुग्णांना नवे आयुष्य देते.
रुग्ण महिला रत्ना पेंडसे (बदललेले नाव) म्हणाल्या की, मी पडल्यानंतर मला माझे स्वातंत्र्य परत मिळेल आणि मी स्वतःहून सगळय़ा गोष्टी करू शकेन असे मला कधीच वाटले नव्हते. परंतु पेनेक्स क्लिनिकमध्ये केलेल्या प्रगत वैद्यकीय प्रक्रियेमुळे मी आता स्वतंत्रपणे बसू आणि पुन्हा एकदा चालू शकत आहे. आधुनिक तंत्रज्ञान काय करू शकते हे खरोखरच आश्चर्यकारक आहे.