प्रतिनिधी /पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सादर केलेला 2023-24 मांडलेल्या अर्थसंकल्पात कोणतेही नवे कर आकारले नसून विविध योजनांसाठी आर्थिक तरतूद केली आहे. स्वयंमपूर्ण गोवा करण्यासाठी अर्थसंकल्प योग्य असल्याचे वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी सांगितले. पावसाळी अधीवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थसंकल्पावर चर्चा करताना दाजी साळकर बोलत होते. गोवा विकासाच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करीत आहे. सरकारची प्रत्येक योजना ही प्रत्येक गरजू व्यक्ती पर्यंत पोचावी म्हणून मुख्यमंत्री अंतोदय तत्वावर काम करीत आहे. त्यामुळे त्यांनी मांडलेला अर्थसंकल्प हाही तशाच पध्दतीचा असल्याचे दाजी साळकर म्हणाले. इतर राज्याच्या तुलने गोव्यातील रस्ते खूप चांगले आहेत. आरोग्य क्षेत्र, क्रिडा क्षेत्र, युवकांना रोजगार, व्यवसाय या सगळ्या गोष्टींसाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात आलेली असतानाच धार्मिक भावना जपण्यासाठी मुख्यमंत्री तिर्थयात्रा व देवदर्शना योजना तयार केली असून त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मुलांना अनेक कारणामुळे आपल्या आई वडिलांना तिर्थक्षेत्रासाठी नेता येत नाही त्यासाठी ही योजना करण्यात आली असून अनेक लोक याचा फायदा घेत आहेत. असेही दाजी साळकर म्हणाले.









