मुख्यमंत्र्यांकडून लवकरच अधिकृत घोषणा : मंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती
पणजी : गोव्यातील आयआयटीसाठी सांगे तालुक्यासह मतदारसंघातच नवीन जागा निश्चित करण्यात आली असून त्याकरिता 10 लाख चौ. मी. जागा ताब्यात घेण्यात येणार आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अधिकृत घोषणा करणार असल्याचेही माहिती मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. आयआयटी आता सांगे तालुक्यात होणार असून यापूर्वी ठरवण्यात आलेल्या जागेला स्थानिकांनी विरोध केला होता. ती जागा तशी अपुरीच होती आणि आयआयटी निवड समितीने नाकारली होती. हे त्या मागील खरे सत्य आहे. आता नवीन जागेला विरोध होण्याची शक्यता नसल्याची खात्री फळदेसाई यांनी वर्तविली आहे. नवी जागा रिवण येथील आहे.









