कार्यकारी संचालक चंद्रशेखर यांची माहिती : ब्रँडेड उत्पादनांवर 10 टक्के सूट
बेळगाव : ग्राहकांना उत्तम गुणवत्ता, निवडीला भरपूर स्वातंत्र्य आणि कमी दर असा तिहेरी संगम साधत ‘बीएससी : द टेक्स्टाईल मॉल’ने नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत आमच्या मॉलमधील वस्त्रप्रावरणांपेक्षा त्याच दर्जाची परंतु किंमत कमी असलेली वस्त्रप्रावरणे बाहेर उपलब्ध झाली व ग्राहकाने बिलासह ती आम्हाला दाखविली तर दरातील तफावतीच्या दुप्पट रक्कम बीएससी मॉलतर्फे दिली जाईल, अशी माहिती मॉलचे कार्यकारी संचालक चंद्रशेखर यांनी दिली. या योजनेबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, आमच्यासाठी ग्राहक नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. त्याला केंद्रीभूत करूनच आम्ही योजना राबवत आहोत. त्यामुळे ही नवीन योजना आम्ही सुरू केली आहे. आमच्या मॉलमधील उत्पादनांचे दर माफक आहेत. मात्र, त्याहीपेक्षा कमी किमतीत कोणाला त्याच गुणवत्तेचे उत्पादन बाहेर उपलब्ध झाले आणि ते बीएससी मॉलमध्ये येऊन सिद्ध केले तर आम्ही तफावतीच्या दुप्पट रक्कम देण्यास बांधिल आहोत.
दावणगेरी येथील आमच्या शोरुमला अनेक दशकांची परंपरा आहे. पण बेळगावमध्ये आम्ही नवीन असूनही बेळगावकरांनी आम्हाला उत्तम प्रतिसाद दिला आहे. ग्राहकांचा विश्वास हाच आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. दिवाळी आणि त्यापुढे असणारे सर्व सण लक्षात घेऊन आम्ही योजना आखली आहे. ही योजना एप्रिलपर्यंत कार्यान्वित करण्याचा आमचा मनोदय आहे. मात्र, ग्राहकांनी प्रतिसाद दिला तर पुढेही हा कालावधी वाढवू, असे त्यांनी सांगितले. ब्रँडेड कंपनीच्या उत्पादनांना कंपनीने सवलत दिली तर ती आम्ही देतोच. परंतु, कोणत्याही ब्रँडेड कंपनीच्या उत्पादनांना किमतीच्या 10 टक्के सूट आम्ही नेहमीच देतो, असेही त्यांनी नमूद केले. ‘बीएससी’मध्ये ऐन सणाच्या दरम्यान प्रचंड गर्दी होते. त्यामुळे ग्राहकांनी दिवाळीपूर्वीच आपली खरेदी उरकून घेतल्यास त्यांच्यासाठी सोयीचे ठरते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पत्रकार परिषदेवेळी मृणाल बी. सी. उपस्थित होते. इरण्णा व अमजद या विक्री विभागाच्या प्रतिनिधींनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले.









