संरक्षण मंत्रालयाकडून 7,800 कोटींच्या शस्त्रास्त्र खरेदी प्रस्तावांना मंजुरी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
संरक्षण मंत्रालयाने गुऊवारी भारतीय सैन्यासाठी सुमारे 7,800 कोटी ऊपयांच्या विविध शस्त्रास्त्र प्रणालींच्या खरेदीसाठी विविध प्रस्तावांना मंजुरी दिली. यामध्ये एमआय-17व्ही5 हेलिकॉप्टरसाठी इलेक्ट्रॉनिक युद्ध संच खरेदीचाही समावेश आहे. तसेच भारतीय नौदलाच्या शस्त्रास्त्र एमएच-60आर हेलिकॉप्टरच्या खरेदीही समाविष्ट आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने (डीएसी) या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. ‘शक्ती’ प्रकल्पांतर्गत संरक्षण मंत्रालयाने सशस्त्र दलांची परिचालन क्षमता वाढविण्यासाठी सुमारे 7,800 कोटी ऊपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. गुऊवार, 24 ऑगस्ट रोजी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली. भारतीय वायुसेनेच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी, ‘डीएसी’ने हेलिकॉप्टरवर इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूटची खरेदी करण्यास मान्यता दिली. ही यंत्रणा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून खरेदी केली जाणार असून त्यामुळे हेलिकॉप्टरची क्षमता वाढेल. ‘डीएसी’ने मानवरहित पाळत ठेवणे, दाऊगोळा, इंधन आणि सुटे सामानाची लॉजिस्टिक डिलिव्हरी आणि रणांगणातील अपघाती इव्हॅक्मयुएशन यासारख्या विविध मोहिमा पार पाडण्यासाठी यांत्रिक पायदळ आणि आर्मड् रेजिमेंटसाठी स्वायत्त प्रणालींच्या खरेदीसाठी अनुमती दिली आहे. 7.62×51 मिमी लाईट मशीन गन आणि ब्रिज लेइंग टँकच्या खरेदीचा प्रस्ताव देखील ‘डीएसी’ने पाठवला आहे. एलएमजीच्या समावेशामुळे पायदळाची लढाऊ क्षमता वाढेल, तर बीएलटीच्या समावेशामुळे यांत्रिकी सैन्याच्या हालचालींना वेग येईल, असा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
सर्व खरेदी भारतीय विव्रेत्यांकडून
प्रकल्प शक्ती अंतर्गत भारतीय सैन्यासाठी टिकाऊ लॅपटॉप आणि टॅबलेट खरेदीसाठी देखील मान्यता देण्यात आली आहे. तसेच एमएम एलएमजी आणि ब्रिज लेइंग टँकच्या (बीएलटी) खरेदीच्या प्रस्तावांनाही मंजुरी दिली आहे. ही सर्व खरेदी देशी विव्रेत्यांकडूनच केली जाईल, असे मंत्रालयाने सांगितले.









