बसपला मिळाली पल्लवी पटेल यांची साथ
वृत्तसंस्था / लखनौ
उत्तरप्रदेशात अपना दल कमेरावादी आता बसपसोबत मिळून लोकसभा निवडणूक लढविणार आहे. याकरता पक्षाच्या अध्यक्ष कृष्णा पटेल यांनी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या तीन उमेदवारांची यादी मागे घेतली आहे. पक्षाच्या नेत्या पल्लवी पटेल आता बसप सर्वेसर्वा मायावती यांची भेट घेणार आहेत.
यापूवी कृष्णा पटेल यांनी इंडिया आघाडीच्या अंतर्गत स्वत:च्या पातळीवरच तीन मतदारसंघांमधील उमेदवार जाहीर केले होते. आता त्यांनी उमेदवारांची ही यादी मागे घेतली आहे. पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या वक्तव्यामध्ये उमेदवारांची यादी रद्द करण्यात आल्याचे म्हटले गेले आहे. तसेच लवकरच नवी यादी जारी करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अपना दलाने मिर्झापूर, कौशांबी आणि फुलपूरमध्ये निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. आम्ही इंडिया आघाडीत सामील असून आता तीन जागांवर निवडणूक लढविण्याची घोषणा करत असल्याचे कृष्णा पटेल यांनी म्हटले होते.









