नवी दिल्ली :
प्रसारमाध्यमांनी देश निर्मितीत स्वत:ची भूमिका पार पाडावी असे म्हणत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी डिजिटल जाहिरातींसंबंधी नवे धोरण लवकरच सादर केले जाणार असल्याचे सांगितले आहे.
डिजिटल जाहिरातींमध्ये काही मोठ्या कंपन्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा मिळवत आहेत. हे प्रारुप बदलावे लागणार आहे. याचकरता नवे धोरण तयार केले जात असून लवकरच सर्वांसमोर येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









