आशियातील पहिला वर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज : 5 मिनिटात 22 मीटर वर उचलला जाणार
वृत्तसंस्था/ रामेश्वरम
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी तामिळनाडूत रामेश्वरम येथे आशियातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट स्पॅन रेल्वेब्रिजचे उद्घाटन पेले आहे. याचे नाव पंबन ब्रिज असून तो 2.08 किलोमीटर लांब आहे. याचा पाया नोव्हेंबर 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रचण्यात आला होता. हा ब्रिज रामेश्वरमला (पंबन बेट) भारताची मुख्य भूमी तामिळनाडूच्या मंडपमशी जोडतो. भविष्यातील गरजा विचारात घेत याला डबल ट्रॅक आणि हायस्पीड रेल्वेंकरता डिझाइन करण्यात आले आहे. याचबरोबर पंतप्रधान मोदींनी 8300 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीचे विविध रेल्वे आणि रस्तेप्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले आहे.
स्टीलने निर्मित नव्या ब्रिजवर पॉलीसिलोक्सेन कोटिंग करण्यात आले असून ते याला गंज आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून वाचविणार आहे. जुना पूल 2022 मध्ये गंज चढल्याने बंद करण्यात आला होता. यामुळे रामेश्वरम आणि मंडमपदरम्यान रेल्वेसंपर्क संपुष्टात आला होता. रामायणानुसार रामसेतूची निर्मिती रामेश्वरमनजीक धनुषकोडी येथून सुरू झाली होती. याचमुळे हा ब्रिज श्रद्धेच्या दृष्टीकोनातूनही महत्त्वपूर्ण आहे.

5 मिनिटात उचलला जातो वर
नवा पंबन ब्रिज 100 स्पॅन म्हणजे हिस्स्यांनी मिळून तयार करण्यात आला आहे. सागरी जहाजाला वाट मोकळी करून देण्यासाठी या नेव्हिगेशन ब्रिजचा (सागरी जहाजांसाठी खुलणारा ब्रिज) सेंटर स्पॅन (मधला हिस्सा) वर उचलला जातो. हे इलेक्ट्रो-मॅकेनिकल सिस्टीमवर काम करते. यामुळे याचा सेंटर स्पॅन केवळ 5 मिनिटात 22 मीटरपर्यंत वर उचलला जाऊ शकतो. याकरता केवळ एका व्यक्तीची गरज भासते. तर जुना पूल कँटिलीवर पूल होता, याला लीवरद्वारे मॅन्युअली खुले केले जायचे, ज्याकरता 14 जणांची गरज भासत होती.
सागरी वाऱ्याच्या स्थितीत…
सागरी वाऱ्याचा वेग 58 किलोमीटर प्रतितास किंवा त्याहून अधिक असल्यास वर्टिकल सिस्टीम काम करणार नाही आणि ऑटोमॅटिक रेड सिग्नल लागणार आहे. वाऱ्याचा वेग सामान्य होईपर्यंत रेल्वेवाहतूक बंद राहणार आहे. हा प्रकार ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान घडत असतो. या महिन्यांमध्ये जोरदार वारे वाहत असतात.
ब्रिजची यंत्रणा कशी काम करते?
वर्टिकल लिफ्ट ब्रिजचा मॅकेनिज्म बॅलेंसिंग सिस्टीमवर काम करते. यात काउंटर वेट्स लावण्यात आले आहेत. ब्रिज वर उचलला जातो तेव्हा शिव्स म्हणजे मोठमोठ्या चाकांच्या मदतीने स्पॅन आणि काउंटर वेट दोन्हींना सपोर्ट मिळतो. तर ब्रिजखाली आल्यावर काउंटर-वेट्सचे त्याचे वजन सांभाळतात. या तंत्रज्ञानामुळे ब्रिज अधिक वजन झेलू शकतो. यामुळे ब्रिजच्या सेंटर स्पॅनची वर्टिकल लिफ्टिंग सुरळीत आणि सुरक्षितपणे होते.
ब्रिजवर यशस्वी परीक्षण
दक्षिण रेल्वेने 12 जुलै 2024 रोजी नव्या पंबन ब्रिजवर लाइट इंजिनचे ट्रायल रन केले होते. या परीक्षणामुळे ब्रिजच्या मजबुती आणि सुरक्षेची पुष्टी झाली. यानंतर 4 ऑगस्ट रोजी टॉवर कार ट्रायल रन करण्यात आले, ज्यात रामेश्वरम स्थानकापर्यंत ओएचई (ओव्हरहेड इक्विपमेंट) टॉवर कार चालविण्यात आली. 31 जानेवारी 2025 रोजी रामेश्वरम एक्स्प्रेस रेल्वेचे यशस्वी परीक्षण झाले. रेल्वेला मंडपम येथून रामेश्वरम स्थानकापर्यंत नेण्यात आले. यादरम्यान वर्टिकल लिफ्ट ब्रिज पहिल्यांदाच तटरक्षक दलाच्या गस्तनौकेसाठी वर उचलण्यात आला. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी ब्रिजसाठी 75 किलोमीटर प्रतितासाच्या वेगमर्यादेला मंजुरी दिली आहे. परंतु हा नियम ब्रिजच्या खालील हिस्स्याला वर उचलणाऱ्या हिस्स्यावर लागू होणार नाही. लिफ्टयुक्त हिस्स्यासाठी 50 किलोमीटर प्रतितास वेगाची अनुमती देण्यात आली आहे.
नव्या पंबन ब्रिजची वैशिष्ट्यो…
फुली ऑटोमेटेड वर्टिकल लिफ्ट स्पॅन : जुन्या मॅन्युअल शेरजर लिफ्टच्या तुलनेत नवा पूल पूर्णपणे ऑटोमेटेड वर्टिकल लिफ्ट सिस्टीमने युक्त आहे. यामुळे रेल्वेसंचालन अधिक सोपे ठरणार आहे.
अधिक उंचीवरून जाऊ शकणार जहाज : जुना पूल 19 मीटर उंचीपर्यंत वर खुला व्हायचा. परंतु नव्या पुलात 22 मीटरचे एअर क्लियरेंस देण्यात आले आहे. यामुळे मोठी जहाजं सहजपणे ये-जा करू शकतील.
डबल ट्रॅक, इलेक्ट्रिफिकेशन : नव्या पूलाला वेगवान रेल्वेंकरता डिझाइन करण्यात आले आहे. यात डबल ट्रॅक आणि इलेक्ट्रिफाइड सिस्टीम सामील आहे.
नव्या ब्रिजची गरज का भासली?
ब्रिटिश शासनादरम्यान 1850 मध्ये भारत आणि श्रीलंकेला (तेव्हाचा सीलोन) जोडण्यासाठी सागरी मार्ग निर्माण करण्याची योजना आखण्या तआली. याकरता पाल्क सामुद्रधुनीत (सेतुसमुद्रम) एक कालवा तयार करण्याचा विचार होता, परंतु ही योजना आर्थिक आणि पर्यावरणी कारणांमुळे अशक्य वाटू लागली होती. यानंतर ब्रिटिश प्रशासनाने नवी योजना तयार केली. यानुसार तामिळनाडूच्या मंडपम आणि पम्बन बेटादरम्यान रेल्वेमार्ग आणि मग धनुषकोडीपासुन कोलंबोपर्यंत फेरीने अंतर कापले जाणार होते. रामेश्वरम धार्मिक आणि व्यापारी कारणाने महत्त्वपूर्ण होते, मोठ्या संख्येत लोक येथे दर्शनासाठी येत होते. याकरता नौकेचा वापर केला जायचा. परंतु जोरदार वारे आणि सागरी लाटांमुळे हा प्रवास अवघड ठरला होता. तर इंग्रज श्ा़dरीलंका आणि तामिळनाडूदरम्यान उत्तम संपर्कव्यवस्था निर्माण करू पाहत होते. याचमुळे ब्रिटिश प्रशासनाने रेल्वेब्रिज निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता.
कसा तयार झाला पंबन ब्रिज?
मागील ऐतिहासिक पंबन ब्रिज तयार करण्याची योजना 1870 मध्ये आखण्यात आली होती. परंतु प्रत्यक्ष काम 1911 मध्ये सुरू झाले होते. 24 फेब्रुवारी 1914 रोजी या पूलाच्या माध्यमातून रेल्वेसेवा सुरू झाली होती. या पूलाची लांबी 2.06 किलोमीटर होती. याची खास तंत्रज्ञानाने निर्मिती करण्यात आली होती.









