कुलगुरू हरिलाल मेनन यांची माहिती
पणजी : यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शैक्षणिक स्तरावर म्हणजेच गोवा विद्यापीठ, कॉलेजमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणासाठी विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. यंदापासून नवीन शैक्षणिक धोरणात नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक पुनर्रचना करण्यात येणार आहे. या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षाच्या पदवी विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केली जाईल आणि सध्याचे द्वितीय आणि तृतीय वर्षाचे पदवी वर्ग जुन्या पद्धतीनुसार सुरू राहतील अशी घोषणा गोवा विद्यापीठाचे कुलगुरू हरिलाल बी मेनन यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत नवीन चार वर्षांचे पदवी कार्यक्रम आंतरविद्याशाखीय, कौशल्यावर आधारित असतील आणि त्यात अनेक प्रवेश आणि निर्गमन पर्याय असतील. विद्यार्थी चार वर्षांचा कार्यक्रम पूर्ण करून ँA ’ऑनर्स’ पदवी मिळवू शकतो किंवा आठव्या सत्रात संशोधन कार्य निवडू शकतो आणि ँA, ँएम्, किंवा ँण्दस् ’संशोधनासह ऑनर्स’ पदवी मिळवू शकतो अशी माहिती मेनन यांनी दिली. मागील शैक्षणिक धोरणात पदवी अभ्यासक्रम हा तीन वर्षांचा होता. परंतु आता विद्यार्थ्यांना एक वर्षाचा किंवा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम निवड करण्याची संधी मिळणार आहे. नवीन धोरणात विद्यार्थी तीन वर्षानंतर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो किंवा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम निवडून पदवी मिळवू शकतो. तसेच तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सन्मान पदवी तर चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सन्मान संशोधन पदवी प्रदान करण्यात येईल. सन्मान संशोधन पदवी प्राप्त विद्यार्थ्याला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम न करता थेट पीएचडी करण्यासाठी प्रवेश मिळू शकतो. तसेच जो चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम निवडेल त्याला एका वर्षात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता येईल.
आणि जो तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करेल त्याला दोन वर्षात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. कुठल्याही शाखेतील शैक्षणिक वर्षाचे पहिले वर्ष पूर्ण करून कॉलेज सोडेल त्याला प्रमाणपत्र व दोन वर्षांनी शिक्षण पूर्ण करून शिक्षण संस्था सोडेल त्याला डिप्लोमा पदवी देण्याची तरतूद आहे. शैक्षणिक गुणांनुसार त्या विद्यार्थ्याला त्या त्या वर्षात प्रवेश मिळेल. नवीन रचनेत एक प्रमुख एक किरकोळ आणि बहुविद्याशाखीय विभागातील एक विषय मूल्यवर्धित, भाषा या विभागातील एक विषय विद्यार्थ्यांना घेता येईल.अशी माहिती अशी माहिती शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर आयएएस यांनी दिली. बीए, बीएससी, बीकॉम आणि इतर समतुल्य सामान्य शिक्षण पदवीपूर्व कार्यक्रमांच्या प्रवेशांसाठी दि. 29 रोजीपासून उच्च शिक्षण खात्यातर्फे प्ttज्s://dप.gद.gदन्.ग्ह/rाsदल्rम/adस्ग्ssग्दह्/ूपोर्टल खुले करण्यात येईल. उच्च शिक्षण प्रवेश पोर्टल तसेच सर्व महाविद्यालयांच्या वेबसाइटवर किमान 3 प्राध्यापकांची संपर्क माहिती असेल जे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि विविध विषयांबद्दल मार्गदर्शन करतील. विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी जुनी रचना आणि नवीन रचना याविषयी जागरूकता व्हिडिओही उपलब्ध करून देण्यात येतील, असेही लोलयेकर म्हणाले.









