प्रतिनिधी /पणजी
राजधानी पणजीतील नवीन मांडवी पूल देखरेख, चाचणीसाठी येत्या 22 नोव्हेंबरपर्यंत रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत (8 तास) वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. काल बुधवार दि. 2 नोव्हेंबरपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दिवसा हा पूल वाहतुकीस खुला राहणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम खात्याने कळविले आहे.
या बंदीच्या काळात अवजड वाहने ‘अटल सेतू’ या तिसऱया पुलावरून वळविण्यात येणार असून हलकी वाहने जुन्या मांडवी पुलावरून वाहतूक करतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.









