कोल्हापूर / विद्याधर पिंपळे :
उन्हाळा म्हटले की सायकल असो,दुचाकी असो वा जेसीबी पोकलॅन असो त्यांचे टायर पंक्चर होणे अनिवार्य आहे. बदलत्या वाहनाबरोबर पंक्चर व्यवसायाचे चित्रही बदलले आहे. टयूबलेस टायर , नायट्रोजन हवा ,डे–नाईट सर्व्हिस, एवढेच नव्हे तर डोअर डिलिव्हरी सेवा ही सुरू करण्यात आली. यामुळे पंक्चर व्यवसाय आता पूर्णंपर्ण बदलून गेला आहे. कारण हा व्यवसाय उन्हाळयातच जोरात असतो.
कानस, सोल्युशन टयूब, फाटलेल्या टायरचे पॅच तसेच व्हल्कनायझिंगसाठी रॉकेल घातलेले मशिन अशा तुटपुंज्या साहीत्यावर कोल्हापुरमधील पंक्चर व्यवसाय सुरू होता. पंक्चर काढण्याचा दर ही नाममात्र होते. सद्या कोल्हापूर जिल्हयात 5 हजार तर शहरात दीड हजार पंक्चर व्यावसायिक व्यवसाय करत आहेत. पंक्चर काढणे वा सायकल दुरूस्त करणे याशिवाय कोणताच व्यवसाय चालत नसे. हा व्यवसाय उन्हाळयामध्ये जोरात चालत असतो.
- वाहनधारकांची सेवा
रात्री–बेरात्री, दूरच्या ठिकाणी , अडचणीच्यावेळी तसेच यात्रेच्या ठिकाणी पंक्चर व्यावसायिक आपली सेवा देत आहेत. टेंबलाईवाडी येथील एक पंक्चर व्यावसायिक जागेवर जाऊन पंक्चर काढण्याचे काम करत आहेत. महामार्गावरील पेट्रोल पंपावर पंक्चर काडण्याची सोय असते. पण अडचणीवेळी कोणीच भेटत नसतात. यासाठी कोल्हापूर पंक्चर असोसिएशनने ही फिरती सेवा ही सुरू केली आहे.
सायकल, दुचाकी व चार चाकी वाहनाच्या पंक्चर व्यवसायामध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. त्याचबरोबर बदलत्या वाहनानुसार टायर–टयूबही बदलले आहे. सद्या वाहनामध्ये टयूबलेस टायरचा वापर वाढला आहे. त्याच परिणाम पंक्चर व्यवसायाचे तंत्र ही बदलले आहे. आज पंक्चर व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान दोन ते तीन लाख रूपयाची गुंतवणूक करावी लागत आहे. आज पंक्चर व्यवसाय विस्तारीत होत आहे. ट्रॅक्टर, जेसीबी यांचे पंक्चर हे पारंपारिक पध्दतीने काढले जाते. तर टयूबलेस टायरचे पंक्चर कांही मिनिटातच काढले जात आहे. सायकलला हवा भरण्यासाठी तीन, दुचाकीसाठी 10 तर चारचाकीसाठी 30 रूपये मोजावे लागते. तर नायट्रोजन हवेसाठी अनुक्रमे 10, दुचाकीसाठी 20 तर चारचाकीला 80 रूपये मोजावे लागते.
- पंक्चरचे आताचे दर
–टायर साईज 145 आर 16: 100
-155 आर 14/15: 120
–फक्त स्वत: टायर आणलेस s पंक्चर : 100
–जॅक लावून: 150
–ट्रॅक्टर पुढचे चाक: 100
–मागचे चाक: 350
–ट्रॉलीचे: 150
–जेसीबी पोकलॅन 550
- व्यवासायाचे तंत्र बदलले … गुंतवणूकही वाढली
आज पंक्चर व्यवसायाचे चित्र बदलले आहे. बॅटरीवरील ग्रायंडर, काँम्प्रेशर, व्हल्कनायसिंग हिटर, नटबोल्ट गन, नायट्रोजन मशिन आदि उपकरणे आता आवश्यक व गरजेचे ठरत आहे. यामुळे आज किमान लाखोची गुंतवणूक करावी लागत आहे. हा व्यवसाय सिजनेबल आहे.
–अनिल कोडोलिकर,अध्यक्ष, कोल्हापूर पंक्चर असोसिएशन








