वेंगुर्ले (वार्ताहर)-
प्रवाश्यांना एस. टी. बसेसच्या प्रवासी सेवेचा लाभ घेण्याचे वेंगुर्ले आगार व्यवस्थापकांचे आवाहन
वेंगुर्ले आगारातून मुंबई-परेल, पुणे, तुळजापूर, बेळगांव अशा नवीन लांबपल्ल्याच्या एस.टी. बसेस उन्हाळी हंगामासाठी दि १५ जनूपर्यंत चालू करण्यात आल्या आहे. या बसगाड्यांचा लाभ प्रवासी वर्गाने घ्यावा असे आवाहन वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहुल कुंभार व बसस्थानक प्रमुख निलेश वारंग यांनी केले आहे. वेंगुर्ले आगाराने शाळांना पडलेल्या सुट्टी, तसेच उन्हाळी हंगामात कोकणातील विविध फळांचा हंगाम असल्याने वेंगुर्ले तालुक्यातील आपल्या गावी आलेले मुंबई, पुणे यासह अन्य दुरच्या भागातील चाकरमानी यांना प्रवासी चांगली देण्याच्या उद्देशाने विविध लॉबपल्ल्याच्या एस.टी.बस गाड्या वेंगुर्ले आगारातून सुरू करण्यात आलेल्या आहेत. यात पुढील गाड्यांचा समावेश आहे.
वेंगुर्ले आगारातून वेंगुर्ले आजरामार्गे बेळगांव हि बस सकाळी ०५.१५ वाजता निघेल तर ती बेळगांव— वेंगुर्ले अशी बेळगांवातून सकाळी १० वाजता वेंगुर्लेसाठी निघेल. वेंगुर्ले-पुणे रातराणी हि बस सायंकाळी ४ वाजता आजरामार्गे निघणार असून ती पुणे आजरामार्गे वेंगुर्लेस परतीसाठी पुणे येथून सायंकाळी ७ वाजता निघेल आरोंदा-परेल हि बस वेंगुर्ले आगारातून सायंकाळी ४ वाजता निघणार आहेत तर परेल-आरोंदा हि बस परेल येथून सायंकाळी ४ वाजता सुटणार आहे. वेंगुर्ले आचरामार्गे तुळजापूर हि बसवेंगुर्ले आगारातून पहाटे ५ वाजता सुटणार आहेत तर तुळजापूर आजरामार्गे वेंगुर्ले हि बस तुळजापूर येथून पहाटे ५ वाजता सुटणार आहे. वेंगुर्ले बावडामार्गे कोल्हापूर हि बस वेंगुर्ले आगारातून दुपारी २.३० वाजता सुटणार आहे. तरी हि बस कोल्हापूर-फोडामार्गे वेंगुर्ले अशी कोल्हापूरहून सकाळी ६ वाजता सुटणार आहे. वेंगुर्ले दाभोली-बावडामार्गे पुणे हि बस वेंगुर्ल आगारातून सकाळी ९ वाजता सुटणार असून हि बस पुणे-फोंडाघाट- मठमार्गे अशी पुणे येथून सकाळी ९ वाजता सुटणार आहे.या शिवाय लग्नसराई असल्याने वाह वाहातुक सेवासाठी तसेच प्रवाश्यांच्यामागणीनुसार आणि बुकिंगनुसार एस. टी. बसेस उपलब्द करून देण्यात येणार आहेत.आपल्या हक्काची, सुखरूप व सुरक्षित प्रवासी सेवा देणाऱ्या एस. टी. बसेसच्या प्रवासी सेवेचा लाभ तमाम प्रवाश्यांनी घ्यावा असे आवाहन वेंगुर्ले आगाराचे व्यवस्थापक राहुल कुमार व बसस्थानक प्रमुख निलेश वारंग यांनी केले आहे.









