केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अंतराळ क्षेत्राला नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकार एका नव्या कायद्यावर काम करत आहे. या क्षेत्रात मागील चार वर्षांमध्ये अनेक सुधारणा झाल्या आहेत. तर खासगी कंपन्यांनी उपग्रहांची निर्मिती आणि प्रक्षेपणात स्वत:चा ठसा उमटविला असल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी म्हटले आहे. भारताचा पहिला मानवयुक्त अंतराळयान कार्यक्रम ‘गगनयान’ देखील चांगल्याप्रकारे पुढे जात आहे. पहिली मानवरहित मोहीम नव्या वर्षाच्या प्रारंभी प्रक्षेपित होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. अंतराळ क्षेत्रासंबंधीच्या विधेयकावर आम्ही काम करत आहोत. हे विधेयक संमत झाले तर या क्षेत्रात मोठ्या सुधारणा होतील. सरकारने जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत भारताची हिस्सेदारी वाढविण्याच्या उद्देशाने 2020 मध्ये अंतराळ क्षेत्रासाठी सुधारणांची घोषणा केली होती. भारतीय अंतराळ धोरण मागील वर्षी एप्रिलमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजूर करण्यात आल्यावर अंतराळ सुधार दृष्टीकोनाला लागू करण्यासाठी एक व्यापक, समग्र अणि गतिशील चौकटीच्या स्वरुपात जारी करण्यात आले होते असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले. अंतराळ क्षेत्राच्या स्टार्टअपमध्ये वेगाने भर पडली असून दोन खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी यापूर्वीच उपकक्षीय उ•ाणे सुरू केली आहेत. अनेक अन्य स्टार्टअप्सनी प्रक्षेपण यान आणि उपग्रह विकास तसेच अंतराळ विषयक प्रयोगांच्या दिशेने उल्लेखनीय प्रगती केल्याचा दावा केंद्रीय मंत्र्यांनी केला.
स्टार्टअप्सची संख्या
अंतराळ क्षेत्रात स्टार्टअपची संख्या 2014 मये केवळ एक होती. तर 2024 मध्ये ही संख्या वाढून 266 झाली आहे. सरकारेन अंतराळ विभागाच्या अंतर्गत भारतीय राष्ट्रीय अंतराळ संवर्धन आणि प्राधिकरण केंद्र (आयएन-स्पेस) देखील स्थापन केले आहे. आयएन-स्पेस बिगर सरकारी संस्थांच्या अंतराळ घडामोडींना चालना देणे, विनियमित करणे आणि अधिकृत करण्यासाठी सिंगल विंडो एजेन्सीच्या स्वरुपात काम करत असल्याचे सिंह यांनी सांगितले आहे.
नव्या पिढीच्या प्रक्षेपकाच्या निर्मितीचे लक्ष्य
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी गगनयान मोहीम सुरू करणे, भारतीय अंतराळ स्थानक चांद्रयान-4 चे पहिले मॉड्यूल तयार करण्यासाठी चंद्रावरून नमुने आणणे, शुक्राचे अध्ययन करण्यासाठी मोहीम सुरू करणे आणि पुढील पिढीचा प्रक्षेपक निर्माण करण्याचे लक्ष्य निश्चित केले असल्याची माहिती सिंह यानी दिली.
2031 मध्ये अणुऊर्जा तिप्पट
भारताची आण्विक ऊर्जा क्षमता मागील दशकात सुमारे दुप्पट होत 8,081 मेगावॅट झाली आहे. तर 2031 पर्यंत हे प्रमाण तिप्पट होणार असल्याचा दावा व्रींय मंत्र्यांनी केला आहे.
2035 पर्यंत स्वत:चे अंतराळस्थानक
2035 पर्यंत भारताचे स्वत:चे अंतराळ स्थानक असेल आणि त्याला भारतीय अंतराळ स्थानक (बीएएस) म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केली आहे. 2040 पर्यंत एका भारतीयाला चंद्रावर उतरविण्याचे उद्दिष्ट देशाने बाळगले आहे. 52 टन वजनाचे बीएएस प्रारंभी तीन अंतराळवीरांना सामावून घेणार आहे. परंतु भविष्यात याची क्षमता 6 पर्यंत वाढविण्याची योजना आहे. चीनने देखील स्वत:चे अंतराळ स्थानक तयार केले असल्याने भारतासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.









