प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी एसटी विभागात बीएस 6 च्या नव्या कोऱया 21 आरायमदायी लाल बस दाखल झाल्या आहेत़ एकूण 50 गाडय़ा रत्नागिरी विभागासाठी देण्यात आल्या आहेत़ त्यापैकी 21 गाडय़ा दाखल झाल्या असून उर्वरित गाडय़ा लवकरच येणार असल्याचे एसटी विभागाकडून सांगण्यात आले. एसटीची प्रवासी संख्या दिवसेंदिवस घटत असल्याचे चित्र असताना नव्याने दाखल झालेल्या गाडय़ांमुळे एसटी विभागाकडे पुन्हा प्रवासी वळण्याची आशा व्यक्त केली जात आह़े
एसटीचे अत्याधुनिकरण करण्याच्या दृष्टीने नव्याने बस वापरात आणण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला होत़ा जुन्या गांडय़ांमुळे प्रदूषण होत असल्याने नव्याने बीएस 6 प्रणालीच्या बस आणण्यात आल्य़ा या बसमध्ये अत्याधुनिक उत्तम दर्जाच्या सुविधा प्रवाशांना मिळणार आहेत. यामध्ये 44 आसनांची आणि टू बाय टू अशी आसन रचना, स्वयंचलित दरवाजा, पुढच्या आणि मागच्या बाजूला डिजिटल मार्गदर्शक फलक, मोबाईल चार्जिंग, उद्घोषणेची सुविधा, फस्ट एड, मागे आपत्कालीन दरवाजा आदी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत़ त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आह़े
रत्नागिरी विभागाला देण्यात आलेल्या या सर्व बस कंत्राटी पद्धतीने चालणार आहेत़ बसवरील चालक, बसचा देखभाल खर्च हा खासगी कंत्राटदार करणार आह़े त्या बदल्यात एसटी विभागाकडून काही रक्कम देण्याचा करार करण्यात आला आह़े एकूण 50 बस रत्नागिरी विभागाला देण्यात येणार आहेत़ आतापर्यंत 21 बस दाखल झाल्या आहेत़ बसचे रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नसल्याचे एसटी विभागाकडून सांगण्यात आले.
नोंदणीनंतरच आगारासाठी बसची विभागणी
रत्नागिरी विभागात दाखल झालेल्या नव्या गाडय़ांच्या नोंदणीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आह़े त्यानंतरच प्रत्येक आगारासाठी बसची विभागणी करून दिली जाईल़ एकूण 50 बस रत्नागिरी विभागासाठी देण्यात येणार आहेत़ त्यापैकी केवळ 21 बस दाखल झाल्या आहेत़ उर्वरित बस दाखल झाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल़
–प्रज्ञेश बोरसे (विभागीय नियंत्रक, रत्नागिरी)









