नवी दिल्ली :
दुचाकी निर्मितीतील दिग्गज कंपनी हिरो मोटोकॉर्प यांनी आपल्या नवीन करिझ्मा झेडएमआर या गाडीचा टीझर नुकताच प्रदर्शित केला आहे. दहा सेकंदामध्ये दाखवलेल्या टीझरमध्ये गाडीचे काही भाग दाखवण्यात आले आहेत.
कंपनीची ही नवी गाडी 29 ऑगस्ट रोजी लॉन्च करण्याची योजना आहे. सदरची नवी गाडी ही युवकांना समोर ठेवून बनवण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. या गाडीला स्पोर्टी लुक देण्यात आला असून बाईक चालवण्यासाठी आरामदायी व्हावी याकरीता सीट अधिक आरामदायी बनवण्यात आली आहे. या गाडीमध्ये डीओएचसी व लिक्वीड कुलिंग इंजिन असण्याची शक्यता सांगितली जात असून 210 सीसीचे हे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्ससोबत येणार असल्याचीही माहिती समोर येते आहे.
या इतर सुविधा मिळणार
फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्रीन, ब्रास फिनिशमध्ये इंजिनचे केसिंग, एलईडी हेडलाईट, 17 इंचाचे व्हील, मोनोशॉक युनिट अशा विविध सुविधाही यात असतील. किमतीबाबत मात्र खुलासा करण्यात आलेला नाही.









