प्रतिनिधी/ बेळगाव
देशाच्या विविध भागात उत्तम वस्तूंचे प्रदर्शन यशस्वी करून न्यू इंडियन क्राफ्ट्स एक्स्पो आता कुंदा नगरी बेळगाव येथे रविवार दि. 6 नोव्हेंबरपासून मंगल ग्राऊंड, अग्निशमन दलसमोर, खानापूर रोड येथे येत आहे. या प्रदर्शनात देशभरातील 100 हून अधिक स्टॉलधारकांनी भाग घेतला आहे. सदर प्रदर्शन ताज थ्रेड, हँडलूम गुड्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि यश कम्युनिकेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उडिशा, काश्मीर, शिमला, पंजाब, आसाम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक येथील हस्तकला कारागीरांनी बनविलेल्या वस्तू या प्रदर्शनात अत्यंत माफक दरात उपलब्ध होत आहेत.
हँडमेड गिफ्ट्स, हँडमेड प्रॉडक्ट्स, ज्वेलरी, टेराकोटा होम डेकोर, खुर्च्या क्रॉकरी, डिझाईनर क्लॉथ, वाराणसी साडी, कोलकाता, आसामी साडी व क्लॉथ, भागलपूर साडी, पंजाबी व राजस्थानी चप्पल, कारपेट, पायपोस, हर्बल प्रॉडक्ट्स, होम फर्निशिंग बुक्स, शूज रॅक, काश्मिरी शाल व सूट, खादी कपडा, खादी हँडलुम, गुजराती पर्स, किचन वेअर, सहारनपूर फर्निचर, राजस्थानी लोणचे, लाखेच्या बांगडय़ा, टी-शर्ट, मुलांची खेळणी, जयपुरी रजई, लेदर आयटम, बेडशीट, वुडन कार्विंग, मेटल क्राफ्ट, लेडिज कुर्ती, गाऊन, क्रॉकरी, बरण्या, आयुर्वेदिक उत्पादने, राजस्थानी चुर्ण, सॉफ्ट खेळणी, चन्नपट्टण खेळणी, सौंदर्य प्रसाधने, गृह सजावटीसाठीचे विविध साहित्य, हैद्राबादी बँगल्स, मोती, खवय्यांसाठी मसाले, लोणचे, पापड, चटण्या, विंडोज डोअर कर्टन्स, लेडिज गाऊन, मोबाईल कव्हर, शिवाय मैसूर हेअर ऑईल, तिरुपूर टी-शर्ट, पायजमा, ट्रक सूट, बेडशीट्सच्या शेकडो व्हरायटीज अत्यंत वाजवी दरात उपलब्ध आहेत.
संपूर्ण कुटुंबाची खरेदी एकाच ठिकाणी करता यावी अशा प्रकारचे हे प्रदर्शन 30 दिवस चालणार असून प्रदर्शनात प्रवेश व पार्किंगची मोफत सोय आहे. हस्तकला कारागीरांना प्रोत्साहन देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक आशु शर्मा व प्रकाश कालकुंद्रीकर यांनी दिली.









