नगरसेवकांच्या उपस्थितीत प्रभागनिहाय वितरण
बेळगाव : महापालिकेच्यावतीने कचरा समस्येवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. गटारीतील ओला कचरा काढण्यासाठी शहरातील विविध प्रभागांसाठी नवीन कचरा गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नुकतेच नवीन गाड्यांचे संबंधित नगरसेवकांच्या उपस्थितीत प्रभागनिहाय वितरण करण्यात आले. महानगरपालिकेच्या सफाई कामगारांकडे यापूर्वी गटारातील कचरा काढण्यासाठी देण्यात आलेल्या हातगाड्या नादुरुस्त झाल्या होत्या. गटारीतील कचरा काढून त्यामध्ये भरण्यात आल्यानंतर सांडपाणी व इतर घाण सडक्या पत्रातून खाली पडत होती. त्यामुळे याचा त्रास नागरिकांना सहन करण्यासह दुगर्धींचा सामना करण्याची वेळ आली होती.
याबाबत नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी आपल्या प्रभागातील स्वच्छता निरीक्षक अनंत पिंपरे यांच्याकडे नवीन कचरा गाड्या उपलब्ध करून देण्यासंदर्भात गेल्या दोन वषर्पांसून पाठपुरावा चालविला होता. त्यामुळे या मागणीची दखल घेत स्वच्छता निरीक्षक अनंत पिंपरे यांनी प्रभाग क्र. 10 सह इतर प्रभागांसाठी प्रत्येकी 2 अशा दहा कचरा गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. सदर कचरा गाड्यांचे नुकतेच वितरण करण्यात आले असून, त्यामधून आता गटारीतील कचरा काढला जाणार आहे. नवीन कचरा गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.









