शिवसेनेचे शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर यांच्या मागणीला यश
प्रतिनिधी / बांदा
शहरासाठी कचरा व घंटागाडी मिळावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेनेचे शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली होती. मंत्री केसरकर यांनी तत्काळ प्रतिसाद देत गाडीसाठी १२ लाखांचा निधी मंजूर केला आहे. निधी मंजुरीचे पत्र जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले असून लवकरच बांदा शहरासाठी नवीन कचरा व घंटागाडी उपलब्ध होणार असल्याची माहिती काणेकर यांनी दिली आहे. बांदा शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. सावंतवाडी ग्रामपंचायत असलेल्या बांदा ग्रामपंचायतकडे कचरा उचलण्याची मर्यादा येत आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीसाठी कचरा गाडी मिळावी, अशी मागणी काणेकर
यांनी निवेदनाद्वारे मंत्री केसरकरयांच्याकडे आठ दिवसांपूर्वी केली होती. केसरकर यांनी स्थानिक आमदार विकास निधीतून निधी मंजूर केल्याने श्री. काणेकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत.









