वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आगामी अल्टीमेट टेबल टेनिस (युटीटी) हंगामासाठी पुणेरी पलटणने माघार घेतल्याने त्यांच्या जागी कोलकाता थंडर ब्लेड्स या नव्या फ्रांचायजीचा समावेश करण्यात आला आहे. युटीटीमधून पुणेरी पलटणच्या फ्रांचायजींनी पुढील हंगामात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने या नव्या फ्रांचायजींचा आगामी लीग स्पर्धेत समावेश राहील.
पुनीत बालन ग्रुपचे मालक बेंगळूर स्मॅशर्स हे असून त्यांनी आपल्या संघाचे पुणे जॉगर्स असे नवे नामकरण केले. पुणे पलटणने या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर बेंगळूर स्मॅशर्सने हा निर्णय घेतला. 2025 ची अल्टीमेट टेबल टेनिस (युटीटी) लीग सांघिक स्पर्धा अहमदाबादमध्ये 29 मे ते 15 जून दरम्यान आयोजित केली आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघांचा समावेश राहिल. त्यामध्ये कोलकत्ता फ्रांचायजीचा सहभाग आहे. युनिकॉप्स ग्रुप आणि एम. विकास ग्रुप हे कोलकत्ता फ्रांचायजींचे आहेत. माजी टेबल टेनिसपटू अनशुल गर्ग आता कोलकत्ता थंडर ब्लेड्स संघाचे नवे संचालक म्हणून राहतील. अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेच्या 2025 चा सहावा हंगाम असून या स्पर्धेला संपूर्ण देशातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सदर स्पर्धा अहमदाबादमध्ये पहिल्यांदाच आयोजित केली आहे.









