आचरा प्रतिनिधी
मालवण तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा शिरवंडे हायस्कूल येथील भव्य पटांगणावर पार पडल्या या स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कुललच्या भावेश रामचंद्र मेस्त्री याने १४ वर्षाखालील थाळीफेक प्रथम क्रमांक,१७ वर्षाखालील गटांमध्ये ३किमी चालणे व लांब उडी यामध्ये द्वितीय क्रमांक तनिष्का लवू घाडी हिने मिळविला. मेघा प्रमोद सातपुते हिने २०० मिटर. ४००मिटर धावणे, ४१०० रिले मध्ये प्रथम क्रमांक मिळविला. वैष्णवी आनंद परब हिने उंच उडीत प्रथम क्रमांक मिळविला. वैष्णवी शशिकांत मिराशी हिने हर्डल्स मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. राकेश देसाई ८००मिटर धावणे प्रथम, मॅकलिन फर्नांडिस ३००मिटर धावणे द्वितीय, विनय जंगले थाळीफेक द्वितीय, मयुरेश कुंभार हातोडाफेक द्वितीय,४४००रीले मध्ये तेजस पेडणेकर, भुवन परब, साईनाथ तोंडवळकर, गौरव अपराज यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
१९वर्षाखालील गटात सलोनी पडवळ १००मिटर व८००मीटर धावणेमध्ये द्वितीय क्रमांक ,निष्मा खोत ४००मिटर धावणे प्रथम,सिद्धी पाटणकर उंच उडी प्रथम, मयुरेश पुजारे. ४००मिटर धावणे ,४००मिटर अडथळा शर्यत प्रथम प्रथमेश प्रथमेश पुजारी ३००० मीटर धावणे प्रथम संकल्प परब ८००मीटर धावणे प्रथम उर्विक वायंगणकर पंधराशे मीटर धावणे प्रथम अथर्व सावंत 110 मीटर अडथळा शर्यत प्रथम ४४०० मीटर रिले मध्ये महेश पुजारी प्रथमेश पुजारी संकल्प परब गौरव घाडीगावकर अथर्व सावंत यांनी प्रथम क्रमांक मिळविला .हर्ष घाडी लांब उडी द्वितीय उंच उडी द्वितीय ,विनीत पांगे थाळीफेक हातोडा फेक प्रथम पियुष मुंडेकर हातोडा फेक द्वितीय आयर्न नागले गोळा फेक तृतीय.यशस्वी विद्यार्थ्यांचे धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित मुंबई समिती पदाधिकारी, स्थानिक स्कूल कमेटी, मुख्याध्यापक,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.









