आचरा प्रतिनिधी
न्यू इंग्लिश स्कूल आचराचे दहावी परीक्षेत१००टक्के यश.धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कुल आचरा हायस्कूल ने दहावी परीक्षेत उज्वल यश संपादन करत सर्व च्या सर्व ८८ विद्यार्थी पास होत १००टक्के निकाल लागला.
प्रथम क्रमांक वेदांत संतोष गोसावी ९७.२०टक्के
द्वितीय क्रमांक प्रितम रवींद्र कोळगे ९६.४०टक्के
तृतीय क्रमांक अदिती जितेंद्र गरड ९४.४०टक्के
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब मिराशी, सचिव अशोक पाडावे, स्थानिक स्कूल कमेटी अध्यक्षा निलिमा सावंत ,समिती सदस्य बाबाजी भिसळे, अर्जुन बापर्डेकर, राजन पांगे, संजय पाटील, शंकर मिराशी, तसेच मुख्याध्यापक गोपाळ परब,उपमुख्याध्यापक अंकुश घुटूकडे यांनी अभिनंदन केले आहे.
आचरा इंग्लिश मिडीयमचा निकाल १०० टक्के.धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित माध्यमिक शालांत परीक्षेत नामदेव शंकर कावले इंग्लिश मिडियम स्कुल आचरा चा निकाल १००%लागला आहे.या प्रशालेतून ३१ विद्यार्थी परीक्षेत बसले होते ते सर्वजण उत्तीर्ण झाले असून १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये विशेष नाविन्यपूर्ण यश मिळविलेले विद्यार्थी..
प्रथम अपेक्षा अशोक कांदळगावकर ९१.८०,
द्वितीय क्रमांक अथर्व गोपाळ कदम ९१.६०,
तृतीय क्रमांक सेविया संतातोन फर्नांडीस
यावेळी स्थानिक स्कूल कमेटी अध्यक्ष निलेश सरजोशी,खजिनदार परेश सावंत, सदस्य मंदार सांबारी,सुरेश गांवकर, दिलीप कावले, मुख्याध्यापिका मायलीन फर्नांडिस यांनी अभिनंदन केले आहे.









