हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारावर काम करणारे शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पक्ष बांधणीला करमाळा तालुक्यात सुरुवात झाली आहे. पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांना पुन्हा विधानसभेत संधी मिळावी यासाठी तालुक्यातील शिवसैनिकांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले.
शिवसेनेतील शिंदे समर्थक कार्यकर्त्यांची करमाळा येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कार्यालयात बैठक झाली. यावेळी मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संपर्कप्रमुख आमदार तानाजी सावंत , माजी आमदार नारायण पाटील व आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा शहर प्रमुख म्हणून संजय शीलवंत, उपशहर प्रमुख म्हणून राजेंद्र काळे व नागेश गुरव यांची नियुक्ती करण्यात आली. जेऊर शिवसेना वैद्यकीय मदत पक्ष समन्वयक म्हणून गणेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी करमाळा शहरातील सर्व 20 वार्डातून शिवसेनेचा शाखेचे उद्घाटन येत्या महिन्याभरात करण्याचे निश्चित करण्यात आले. करमाळा तालुक्यातील शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या सर्व निवडी आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीत मुलाखती घेऊन करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली.
हेही वाचा- इंदापूरमध्ये कारवार एव्हीएशनचं विमान कोसळलं ; पायलट महिला जखमी
येणाऱ्या करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व वीस वार्ड लढविण्याची तयारी शिवसेनेने केली असून, येणाऱ्या काळात समविचारी पक्ष सोबत आले तर युती करण्यासाठी सुद्धा तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा शहरातील शिवसेना मजबूत करून शहरातील सार्वजनिक प्रश्न सोडवणार असल्याची ग्वाही यावेळी संजय शीलवंत यांनी दिली.
हेही वाचा- कोल्हापुरात शिवसेना आक्रमक; खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा
शिवसेनेमध्ये ज्यांना पदाधिकारी होऊन काम करून समाजसेवा करायची आहे अशा कार्यकर्त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन उपजिल्हाप्रमुखांनी केले आहे .तसेच शिवसेना महिला आघाडीची सुद्धा नव्याने बांधणी होणार असून इच्छुकांनी शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाशी संपर्क साधावा असेही सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








