वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोलकाता नाइट रायडर्सने बायोडिग्रेडेबल सामग्रीपासून बनवलेल्या त्यांच्या नवीन जर्सीची घोषणा केली आहे. ही ‘इको-फ्रेंडली’ जर्सी त्यांचा नाविन्यपूर्ण पर्यावरणीय उपक्रम ’रन्स टू रूट्स’सह टिकावूपणा आणि पर्यावरण संवर्धन याकडील संघाच्या बांधिलकीला बळकटी देते, असे ‘केकेआर’ने म्हटले आहे.
मार्चच्या सुऊवातीला अनावरण केलेली नवीन जर्सी 100 टक्के बायोडिग्रेडेबल कंपोस्ट स्थितीत तयार केली गेली आहे, ज्यामुळे क्रिकेटमधील शाश्वत स्पोर्ट्सवेअरसाठी एक मानक स्थापित केले गेले आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या स्थापनेपासूनच्या त्यांच्या विजयाचे स्मरण म्हणून जर्सीवर संघाच्या तीन चॅम्पियनशिप ताऱ्यांचे प्रदर्शन घडविण्यात आले आहे.
इको-फ्रेंडली जर्सीव्यतिरिक्त केकेआरने टिकाऊ पॅकेजिंग सादर केले आहे, जे पाण्याने मातीत पेरल्यावर वनस्पतींमध्ये रूपांतरित होते. पर्यावरणासाठी सकारात्मक योगदान देऊन कचऱ्याचे निर्मूलन करण्याचा हेतू यामागे आहे. नव्या जर्सीबरोबर केकेआर 2025 हंगामात ‘रन्स टू रूट्स’ मोहीम सुरू ठेवेल, 2024 हंगामाच्या शेवटी संघाला मिळालेल्या यशावर आधारित. बायोडिग्रेडेबल जर्सी आणि शाश्वत पॅकेजिंग चाहत्यांसाठी आधीपासूनच उपलब्ध आहे, ज्यामुळे चाहत्यांनाही प्रत्येक खरेदीसह केकेआरच्या पर्यावरणीय मोहिमेत सहभागी होता येईल.
कोलकाता नाइट रायडर्स संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविऊद्ध 22 मार्च रोजी प्रतिष्ठित ईडन गार्डन्सवर त्यांच्या मोहिमेला सुऊवात करेल. आपल्या जेतेपदाचे रक्षण करणे आणि आपल्या वारशात आणखी एक गौरवशाली अध्याय जोडणे हे त्यांचे ध्येय आहे.









