प्रतिनिधी,कोल्हापूर
देशातील शक्तीदेवतांच्या पीठांपैकी साडे तीन शक्तीपीठांचे महाराष्ट्रात दर्शन घडते. याच शक्तीपीठांचे दर्शन गुरुवार 26 जानेवारीच्या प्रजासत्ताकदिनी नवी दिल्लीतील कर्तव्य पथवर (राजपथ) आयोजित संचलनात दाखल केलेल्या चित्ररथातून देशवासियांना घडले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आध्यात्मिक शक्ती असलेल्या साडेतीन शक्तीपिठे आणि नारीशक्तीचा चित्ररथ संचलनात दाखल करण्यात आला होता. या चित्ररथातून महाराष्ट्राची अमूर्त अशी लोककला आणि वैशिष्टय़पूर्ण मंदिरांची शैली देखील दाखवली गेली.
यंदाच्या संचलनासाठी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती हा विषय शासनाने चित्ररथ तयार करण्यासाठी घेतला होता.अतिशय कल्पकतेने तयार केलेला हा चित्ररथ कर्तव्य पथावर उपस्थित असलेल्या नागरिकांच्या दृष्टीने लक्षवेधी व उठावदार ठरला. या चित्ररथात कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर, श्री क्षेत्र तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर, माहूर येथील रेणुकामाता मंदिर (ही तीनही पूर्ण शक्तीपीठे आहेत)व वणी (नाशिक) येथील सप्तश्रुंगीदेवी मंदिर (अर्धेपीठ) या साडेतीन शक्तीपीठांना नारीशक्ती म्हणून स्थान दिले होते. महाराष्ट्राच्या या शक्तीपीठांची माहिती संचलनातून संपूर्ण भारताला समजलीच, शिवाय सोशल मिडीयीच्या माध्यमातून ती जगभरातही पोहोचली. महाराष्ट्रासह देशातील अनेक नेटकऱ्यां नी चित्ररथाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला. त्यालाही देशवासियांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
शक्तीपीठे व नारीशक्तीच्या चित्ररथाला पहिल्या पसंतीचे मत द्या…
दिल्लीतील कर्तव्य पथावर सादर झालेल्या संचलनात देशाच्या प्रत्येक राज्याने सादर केलेल्या चित्ररथांपैकी एका चित्ररथाला पहिला क्रमांक देण्यात येणार आहे. हा पहिला क्रमांक देशवासियांच्या माध्यमातून जाहीर केला जाणार आहे.देशवासिय ज्या चित्ररथाला पहिल्या पसंतीचे देतील,तो चित्ररथ पहिला क्रमांकाने सन्मानित केला जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने वोटिंग घेतले जाणार आहे.तेव्हा संचलनात दाखल केलेल्या महाराष्ट्राच्या शक्तीपीठे व नारीशक्ती या चित्ररथला महाराष्ट्रासह देशवासियांनी पहिल्या पसंतीचे मत द्यावे.आपले मत देण्यासाठी नागरिकांनी आपल्या मोबाईल नंबरवरुन पहिल्या पसंतीचे मत MYGOVPOLL 337011, 12 सोबतच्या मोबाईल नंबरवर (7738299899) पाठवायचे आहे.वरील 12 हा क्रमांक हा महाराष्ट्रासाठी आहे.अधिक माहितीसाठी https://secure.mygov.in/group-poll/vote-your-favorite-tableau-republic-day-2023/ लिंकशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









