ऑनलाईन टीम/तरुण भारत
दिल्लीतील शाहीन बागमध्ये (shaheen bagh) अनधिकृत बांधकामांवर (Unauthorized construction) कारवाई करण्यात येणार आहे. जहांगिरपुरीपासून सुरु झालेला दिल्ली पालिकेचा (MCD) बुलडोझर आता शाहीन बागपर्यंत पोहोचला आहे. आजपासून पाच दिवस दिल्ली पालिका दक्षिण दिल्लीतील (South Delhi) शाहीन बाग भागात अनेक ठिकाणी अतिक्रमणविरोधी अभियान राबवणार आहे. तर नागरीकांनी याविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळे याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शाहीन बागमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाईला सुरवात होणार आहे. पालिकेकडून या पार्श्वभूमीवर आवश्यक तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्ली पालिका आजपासून दक्षिण दिल्लीतील वेगवेगळ्या भागात बुल्डोझर चालवणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात आहे.
दरम्यान, दिल्लीत अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई जोरात सुरु आहे. शाहीन बाग परिसरातील अतिक्रम हटवण्यास आज सुरुवात होऊ शकते. दरम्यान, MCD चे बुलडोझर शाहीनबागमध्ये पोहोचले असून त्याविरोधात नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. याठिकाणी मोठ्या संख्येनं पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.









