मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते शुभारंभ
वार्ताहर/हिंडलगा
विजयनगर येथील सरकारी प्राथमिक कन्नड शाळेच्या नूतन वर्गखोलीचे तसेच मराठी व कन्नड शाळा इमारती रंगकाम, पेव्हर्स बसविणे यांचा शुभारंभ महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते थाटात करण्यात आला. या कार्यक्रमाला ग्राम पंचायत अध्यक्षा मिनाक्षी हित्तलमणी, ग्रा. पं. सदस्य विठ्ठल देसाई, बी. डी. पाटील, राहुल उरणकर, प्रवीण पाटील, गजानन बांदेकर व दोन्ही शाळेच्या एसडीएमसीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. शाळा विकास व्यवस्थापन समितीचे कन्नड शाळेच्या अध्यक्षा पूजा उपाशी, उपाध्यक्षा सविता पुजेर, मराठी शाळेच्या अर्चना पाटील, समीक्षा राऊळ यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सरला कडेमनी यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापिका एन. डी. कीर्तने यांनी स्वागत केले. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते फीत कापून वर्गखोलीचे उद्घाटन करण्यात आले. शाळेच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्पुर शेट्टी, एस. एस. देसाई, सिद्दन्नवर, मेदार, मुगळी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला पालकवर्ग, एसडीएमसीचे सदस्य उपस्थित होते.









