प्रतिनिधी,कोल्हापूर
प्रदेश भाजपची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली असून यामध्ये इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर उपाध्यक्षपदाची तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांच्यावर चिटणीस पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याचबरोबर विशेष निमंत्रितांमध्ये उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, हिंदूराव शेळके, विजय ऊर्फ बाबा देसाई, संग्रामसिंह कुपेकर, आबासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी प्रदेश भाजपची नूतन प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये 45 प्रदेश पदाधिकारी आणि 65 कार्यकारिणी सदस्य आहेत. तसेच 512 निमंत्रित सदस्य आहेत. प्रदेश कार्यकारिणीत यापूर्वी उपाध्यक्षपदी असणाऱ्या माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची त्या पदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. याआधी प्रदेश कार्यकारिणी सदस्य असणाऱ्या देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांना पदोन्नती देताना चिटणीसपदाची जबाबदारी दिली आहे. विशेष निमंत्रितांमध्ये उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह इचलकरंजीचे हिंदूराव शेळके, कोल्हापूरचे विजय ऊर्फ बाबा देसाई, चंदगडचे संग्रामसिंह कुपेकर, आबासाहेब पाटील यांना स्थान देण्यात आहे.
प्रदेश कार्यकारिणी सदस्यांत माजी आमदार अमल महाडीक, संदीप कुंभार, सचिन तोडकर, डॉ. अजय चौगले, संतोष चौधरी, निमंत्रित सदस्यांमध्ये भाजप महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, महेश जाधव, संदीप देसाई, विजयेंद्र माने, डॉ. अरविंद माने, संदीप कुंभार, पृथ्वीराज यादव यांचा समावेश आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









