125 किलोपर्यंत सहन करू शकणार भार : किंमत 20 हजारांपेक्षा कमी
वृत्तसंस्था/ हैदराबाद
डीआरडीओची एक प्रयोगशाळा आणि तेलंगणातील एम्स-बीबीनगरने मिळून एक खास प्रकारचा कार्बन फायरबने निर्मित नवा कृत्रिम पाय तयार केला आहे. हा पाय 125 किलोपर्यंतचा भार सहन करू शकतो आणि याची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा आहे. हा नवा कृत्रिम पाय विदेशी मॉडेल्सइतकाच चांगल्या गुणवत्तेचा असून अत्यंत स्वस्त देखील असल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. डीआरडीएलचे संचालक जी.ए. श्रीनिवास मूर्ती आणि एम्स-बीबीनगरचे कार्यकारी संचालक डॉ. ए संता सिंह यांनी याचे सादरीकरण केले आहे.
हा कृत्रिम पाय अत्याधुनिक कार्बन फायबर सामग्रीने निर्मित असून तो अत्यंत हलका, टिकावू आणि लवचिकतायुक्त आहे. पाय गमावलेल्या आणि दैनंदिन जीवनात चालण्या-फिरण्यास त्रास सहन करत असलेल्या लोकांसाठी या कृत्रिम पायाची खासकरून निर्मिती करण्यात आली आहे. या कृत्रिम पायाला 125 किलोपर्यंतचे वजन उचलण्यासाठी बायोमॅकेनिकल स्वरुपात टेस्ट करण्यात आले असून तो पूर्णपर्ण सुरक्षित आढळला आहे.
डीआरडीओची प्रयोगशाळा डीआरडीएल आणि एम्स-बीबीनगर तेलंगणाने मिळून याची निर्मिती केली आहे. वर्तमान काळात विदेशी कृत्रिम पायांची किंमत 2 लाख रुपयांपर्यंत असते. परंतु एडीआयडीओसीचा खर्च 20 हजार रुपयांपेक्षा कमी ठेवण्याची योजना आहे. म्हणजेच आता गरीब आणि मध्यमवर्गीय परिवारातील दिव्यांग व्यक्तीही या कृत्रिम पायाला बसवून घेऊ शकतील.
कृत्रिम पायाची वैशिष्ट्यो..
भार पेलण्याची क्षमता : 125 किलोपर्यंत वजन पेलू शकतो
तीन वेरिएंट : वेगवेगळे वजन असलेल्या लोकांसाठी
स्वदेशी निर्मिती : भारतातच निर्मित, विदेशी तंत्रज्ञानावर निर्भर नाही
कमी खच: स्वस्त दरात उच्च गुणवत्ता
दीर्घ अन् आरामदायी वापर : विशेष स्वरुपात भारतीय जीवनशैलीनुसार डिझाइन करण्यात आले
‘आत्मनिर्भर भारत’मध्ये योगदान
हा प्रकल्प ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेच्या अंतर्गत एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. यामुळे केवळ तांत्रिक स्वरुपात भारत मजबूत होणार नसून दिव्यांग नागरिकांची सामाजिक आणि आर्थिक भागीदारीही वाढणार आहे. डीआरडीओ आणि एम्स बीबीनगरचा हा प्रकल्प लाखो दिव्यांग भारतीयांसाठी आशेचा नवा किरण घेऊन आला आहे.









