सत्र न्यायाधीशांच्या बदलीचा परिणाम; निकालासाठी होणार विलंब
रत्नागिरी प्रतिनिधी
जाकादेवी सेंट्रल बँक दरोडा खटल्यात सरकारी पक्षाकडून पुन्हा नव्याने युक्तीवाद करण्यात येणार आह़े रत्नागिरी सत्र न्यायाधीश महम्मद कासीम शेख मुसा शेख यांच्या न्यायालयात हा खटला चालवण्यात येत होत़ा दरम्यान शेख यांची रत्नागिरीमधून बदली झाली आह़े यामुळे जाकादेवी बँक दराडो खटल्याचा पुन्हा नव्याने युक्तीवाद केला जाणार असल्याची माहिती सरकारी पक्षाकडून देण्यात आल़ी.
जाकादेवी सेंट्रल बँक येथे 28 नोव्हेंबर 2013 रोजी दरोडा टाकण्यात आला होत़ा यावेळी संशयित आरोपी यांनी बँकेतील कर्मचारी संतोष चव्हाण (ऱा धामणसे) गोळी घालून ठार केले होत़े तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला होत़ा तसेच संशयित आरोपी हे बँकेच्या तिजोरीतील सुमारे 6 लाख 88 हजार रुपयांची रक्कम घेऊन आरोपी खासगी वाहनाने फरारी झाले, असा आरोप संशयित 6 जणांवर ठेवण्यात आला होत़ा या आरोपींमध्ये राजेंद्र राजावत (25, रा. कल्याण), हरिष गोस्वामी (25, रा. कल्याण), प्रथमेश सावंत (18, रा. जाकादेवी), शिवाजी भिसे (25, रा. कल्याण), निखिल सावंत (24,रा. डोंबिवली) आणि प्रशांत शेलार (28, रा. मुंबई) यांचा समावेश आहे.
या खटल्यात एकूण 35 साक्षीदारांनी आपला जबाब न्यायालयापुढे नोंदवला आह़े यातील 2 साक्षीदार हे सरकारी पक्षाला फितूर (फुटले) झाले आहेत़ बँक दरोडा घटनेला आता 9 वर्ष उलटून गेल असली तरी हा खटला सत्र न्यायालयात अद्याप पलंबित राहिला आह़े विविध कारणांनी यापूर्वी या खटल्याच्या कामकाजात अडथळे निर्माण झाले होत़े पुढील काही महिन्यात या खटल्याचा निकाल लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होत़ी दरम्यान आता न्यायाधीशांची बदली झाल्याने पुन्हा एकदा नव्याने युक्तीवादाला सुरूवात करावी लागणार आह़े सरकारी पक्षाच्यावतीने ऍड़ पुष्पराज शेट्ये हे खटला चालवत आहेत.
यापूर्वी झालेल्या युक्तीवादाच्यावेळी ऍड. शेट्ये यांनी गुरूवारी न्यायालयापुढे सांगितले की, जाकादेवी बँक दरोडा पकरणात मृत संतोष चव्हाण याचे कपडे जप्त करण्यात आले होत़े त्याच्या शर्ट व बनियनवर होल असल्याचे स्पष्टपणे दिसत आह़े मृत संतोष चव्हाण यांच्या शरीरावरील बंदुकीच्या गोळीची जखम आह़े तसेच त्याच्या शर्ट बनियनलाही होल पडला आह़े त्यामुळे बंदुकीची गोळी त्याच्या शर्ट व बनियनमधून शरीरात गेल्याचे स्पष्ट होत आह़े खटल्यातील कपडे जप्तीचा पंचनामा अत्यंत महत्वाचा पुरावा ठरत आह़े.
दरोड्याच्या घटनेत गोळी लागून गंभीर जखमी गुरव याच्यावर कोल्हापूर येथील रूग्णालयात शस्त्रकिया करण्यात आल़ी त्याच्या शरीरात घुसलेली गोळी डॉक्टरांनी बाहेर काढल़ी ही गोळी बाहेर काढल्यानंतर पंचनामा करण्यात आल़ा शरीरातून बाहेर काढण्यात आलेल्या गोळीमुळे गुरव याला झालेली जखम ही गोळी मारल्याने झाली होती, हे सिद्ध होत़े त्या संबंधीची ऑपरेशन करणाऱया वैद्यकीय अधिकाऱयांची साक्षीचा उल्लेख ऍड़ पुष्पराज शेट्ये यांनी न्यायालयापुढे केल़ा.
खटल्यातील मुख्य आरोपी राजेंद्र राजावत, शिवाजी भिसे व पशात शेलार यांनी पोलिसांना निवेदन दिले होत़े त्यांच्या निवेदनानुसार दरोड्यातील पैसे, बंदूक व इतर मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला होत़ा तसेच आरोपी पशांत याने पळून जाण्यासाठी वापरलेल्या गाडीची बनावट नंबरप्लेट फुणगूस येथे फेकून दिली होत़ी ही नंबर प्लेट त्याने दिलेल्या निवेदनानुसार, पोलिसांकडून जप्त करण्यात आल़ी यामुळे आरोपींनी दिलेल्या या निवेदनामुळे सरकारी पक्षाची बाजू बळकट होत असल्याचे ऍड़ शेट्ये यांनी सांगितल़े.
बँक दरोड्याच्यावेळी पतिभा शिंदे या बँकेत कॅशियर म्हणून काम करत होत्य़ा त्यांनी आपल्या साक्षीत 5 आरोपींना बँकेत पवेश करताना पाहिले होत़े तसेच आरोपीने बँक मॅनेजर कविश्वर यांच्या डोक्याला बंदूक लावून पैसे लुटले, असे त्यांनी पाहिल्याचे न्यायालयापुढे सांगितल़े यावरून बँक मॅनेजर कविश्वर व कॅशियर शिंदे यांचा जबाब एकमेकांशी जुळत आह़े तसेच कॅशियर शिंदे यांनी आरोपी यांना न्यायालयापुढे ओळखले आह़े ही बाबही या खटल्यात अत्यंत महत्वाची असल्याचे ऍड. शेट्ये यांनी न्यायालयापुढे सांगितले होत़े









