33 किलोमीटरच्या मायलेजचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मारुती सुझुकीने आपली हॅचबॅक आल्टो के 10 ही लोकप्रिय गाडी आता एस-सीएनजी तंत्रज्ञानयुक्त इंधनावर आधारीत लाँच केली आहे. व्हीएक्सआय व्हेरियंटमध्ये ही गाडी सादर करण्यात आली असून तिची किंमत 5.94 लाख रुपये (एक्सशोरुम) इतकी राहणार आहे. नेहमीच्या पेट्रोल मॉडेलपेक्षा ही गाडी किंमतीने पाहता 94 हजार रुपये अधिक असल्याचे बोलले जाते.
सदरची नवी कार ही 33.85 किलोमीटरचे मायलेज प्रति किलो इतके देणार आहे. यात ब्ल्यू टूथ कनेक्टिव्हीटी, स्मार्ट प्ले ऑडियो सिस्टम, 2 स्पीकर, सेंट्रल लॉकिंग, युएसबी पोर्ट तसेच प्रंट पॉवर विंडोसारखी फिचर्स असणार आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये ही गाडी लाँच केली होती ती आता विस्तारीत रुपात एस-सीएनजी इंधनावर कंपनीने सादर केली आहे.









