आर्टिफिशियल इंटेलिजेन्सविषयी जगात अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत. एक दिवस एआय माणसांपेक्षा वरचढ ठरणार असल्याचे बोलले जातेय. एआयद्वारे रोबोट आणि चॅटबोट इत्यादी पूर्ण जग आणि मानवतेवर वरचढ ठरतील असा दावा केला जातोय. आता एका उद्योजकाने पुढील 5 वर्षांच्या आत जगात एआययुक्त मनुष्य दिसू लागतील असा दावा केला आहे. हरबर्ट सिम हे लंडनमध्ये न्यूरोचिप डॉट कॉम नावाची कंपनी चालविणारे अब्जाधीश आहेत. ते माणूस आणि त्यावरील एआयच्या प्रयोगांवर संशोधन करत आहेत. 5 वर्षांमध्ये एआययुक्त मनुष्य येईल असा त्यांचा दावा आहे. तंत्रज्ञान मानवतेला बदलेल, हे संशोधन आजारांवर मात करणे आणि दीर्घायुष्याकरता मदत करणार असल्याचे त्यांचे सांगणे आहे. संशोधनात एका हेल्मेटचा वापर केला जात आहे. हे हेल्मेट ब्रेनवेव्सना वाचते, मग याला कॉम्प्युटरवर प्रोजेक्ट केले जाते. कॉम्प्युटर याला कार्यात बदलतो.
लाइफस्टाइल सुधारणा
या संशोधनामुळे शस्त्रक्रियेची गरज भासणार नाही. तसेच मेंदूत चिप बसविण्याची गरज नसेल असे हरबर्ट यांचे सांगणे आहे. हरबर्ट हे 38 वर्षांचे असून ते स्वत:ला फ्यूचरिस्ट म्हणवून घेतात. हे तंत्रज्ञान लवकरच प्रत्यक्षात येईल असे त्यांचे मानणे आहे. ट्रान्सह्यूमनिज्म टेक्नॉलॉजी आणि सायन्सद्वारे मानवतेला पार करता येईल. मानवता आता एका वळणावर आहे. आम्हाला तंत्रज्ञान स्वत:च्या जीवनात अवलंबवावे लागेल. हे आमच्या लाइफस्टाइलला अधिक चांगले करणार आहे. ट्रान्सह्यूमनिज्मद्वारे आम्ही 500 वर्षांपर्यंत जगू शकतो असे हरबर्ट यांचे सांगणे आहे.
नव्या प्रजातीही येणार
आम्ही काय प्राप्त करू शकतो याचा विचार केला जावा. लोक याला फँटेसी म्हणतात, परंतु यात काही सत्यही असू शकते. जगभरातील संस्कृती ड्रॅगन अन् काल्पनिक पात्रांची चित्रे तयार करतात. याचे कारण नव्या प्रजाती येईल आणि त्या माणसांपेक्षा प्रभावी असतील असे हरबर्ट यांनी सांगितले आहे.
स्टेम सेलवर होतेय काम
कालौघात मानवता हळूहळू संपुष्टात येईल. जपानमध्ये यापूर्वी पशु मानव हायब्रिडवर काम होत आहे. जपानच्या सरकारने 2019 मध्ये स्टेम सेल रिसर्चला मंजुरी होती. हे आता हायब्रिड टेस्टिंगच्या टप्प्यात असल्याचे हरबर्ट यांचे सांगणे आहे. हरबटं हे ट्रान्सह्यूमनिज्म डॉट कॉमचेही मालक आहेत. 5 वषांमध्ये मानव हायब्रिड येऊ लागतील. हे तंत्रज्ञान आम्हाला दीर्घायुक्त अन् सुपरपॉवर देईल असे ते सांगत आहेत.









