नवी दिल्ली
फरीदाबादमधील नेटवेब टेक्नॉलॉजीज ही कंपनी अमेरिकेतील चीप क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या एनव्हीडीया यांच्यासोबत भागीदारी करणार असल्याची माहिती आहे. भारतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधित पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी दोन्ही कंपन्या आगामी काळात एकत्रित काम करणार असल्याचे समजते. आगामी काळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित पायाभूत सुविधांवर जास्तीत जास्त भर दिला जाणार असून त्यामध्ये योगदान देण्यासाठी नेटवेब टेक्नॉलॉजीज आघाडी घेणार आहे.









