वृत्तसंस्था/ मुंबई
नेटवेब टेक्नालॉजीस इंडिया लिमिटेडचा आयपीओ गुरुवारी सकाळी सुमारे 90 टक्के म्हणजेच 447 च्या प्रीमियमसह सुचीबद्ध झाला. तसेच ट्रेडिंग सत्रात शेवटच्या टप्प्यात कंपनीचा समभाग हा 82.8 टक्क्यांनी वधारुन तो 910.40 रुपयावर बंद झाला.
हाय-एंड कॉम्प्युटिंग सोल्यूशन्स प्रदाता नेटवेबच्या आयपीओसाठी किंमत 475 ते 500 प्रति इक्विटी समभाग ठेवण्यात आली होती. कंपनीच्या शेअर्सचे वाटप 24 जुलै रोजी झाले. 26 जुलै रोजी कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा झाले.
त्यांचे शेअर्स आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज या दोन्हींवर सूचीबद्ध झाले. हा आयपीओ 17 ते 19 जुलै दरम्यान सार्वजनिक सबक्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता.









