खेड :
कोकण मार्गावरुन नियमित धावणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेसला प्रायोगिक तत्वावर राजापूर स्थानकात थांबा मंजूर झाल्याचे रेल्वे प्रशासनाने सोमवारी सायंकाळी जाहीर केले. त्यानुसार 15 ऑगस्टपासून नेत्रावती एक्स्प्रेस राजापूर स्थानकात थांबणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
नेत्रावती एक्स्प्रेसला राजापूर स्थानकात थांबा मिळावा, यासाठी विविध प्रवासी संघटनांसह राजकीय पक्षांनी आग्रह करत पाठपुरावाही सुरू ठेवला होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. त्यानुसार 16345/16346 क्रमांकाची एलटीटी-तिरुवअनंतपूरम नेत्रावती एक्स्प्रेस राजापूर स्थानकात थांबेल. राजापूर स्थानकात सायंकाळी 7.40 वाजता आगमन होऊन 7.42 वाजता मार्गस्थ होईल. परतीच्या प्रवासात सकाळी 7.38 वाजता आगमन होऊन 7.40 वाजता मार्गस्थ होईल.








