वृत्तसंस्था /नियुवेगिन (नेदरलँड्स)
भारतात ऑक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या आयसीसीच्या 2023 च्या पुरुषांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीच्या नियमानुसार 15 जणांचा नेदरलँड्सचा संघ जाहीर करण्यात आला. नेदरलँडस्ची अनुभवी जोडी व्हान डर मेर्वे आणि कॉलिन अॅकरमन यांचे संघात पुनरागमन झाले आहे. या वर्षाच्या प्रारंभी घेण्यात आलेल्या आयसीसीच्या पुरुषांच्या विश्वचषक पात्र फेरीच्या स्पर्धेत नेदरलँड्स संघाने उपविजेतेपद जिंकून भारतात होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे तिकीट आरक्षित केले. या स्पर्धेसाठी स्कॉट एडवर्डकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत स्कॉट एडवर्डची कामगिरी दर्जेदार झाली होती.
नेदरलँड्स संघ : स्कॉट एडवर्ड (कर्णधार), मॅक्स ओ दाऊद, बास डी लिडी, विक्रम सिंग, एन. तेजा, पॉल व्हॅन, मिकेरीन, कॉलिन अॅकरमन, व्हान डर मेर्वे, लोगेन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रेयान क्लेन, वेस्ले बॅरेसी, शकीब झुल्फिकार, शारीज अहमद, सिब्रँड.









