नवी दिल्ली
जागतिक पातळीवर दिग्गज ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रीड हेस्टिंग्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रीड हेस्टिंग्स हे नेटफ्लिक्स इंकचे सह-संस्थापक देखील होते. नवीन पिढीला व्यवसायाची सूत्रे हाती घेता यावीत यासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. हेस्टिंग्सनी दीर्घकाळ नेटफ्लिक्सच्या व्यवसायाची जबाबदारी घेतली होती. नेटफ्लिक्सचे सीईओ टेड सारंडोस आणि कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग पीटर्स यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात आला आहे.
रीड हेस्टिंग्ज आता यापुढे नेटफ्लिक्सचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. टेड सारंडोस आणि ग्रेग पीटर्स नेटफ्लिक्सचे सीईओ म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत.









