वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
इस्रायलचे नेते बेंजामिन नेतान्याहू हे अचानकपणे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले असून त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली आहे. नेतान्याहू यांच्यासह त्यांच्या सेनेचे मुख्य अधिकारी आणि संरक्षणमंत्री इस्रायल कात्झ हेही आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या या अचानक दौऱ्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये इस्रायल-इराण संघर्षाला वेगळे वळण लागू शकते. ही भेट संघर्ष थांबविण्यासाठी आहे, की तो अधिक तीव्र करण्यासाठी आहे, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, काहीतरी मोठे घडणार आहे असा तर्क करण्यात येत आहे.









