मुंबई
शेअरबाजारात एफएमसीजी क्षेत्रातील नेस्ले इंडिया कंपनीचे समभाग बुधवारी तेजीत पहायला मिळाले. कंपनीचे समभाग शेअरबाजारात इंट्रा डे दरम्यान 4 टक्के वाढत 23,333 रुपयांवर पोहोचले होते. या आधीच्या सत्रामध्ये समभाग 22,338 रुपयांच्या भावावर बंद झाले होते. सरतेशेवटी समभाग 3 टक्के वाढतच बंद झाल्याचे पहायला मिळाले. कंपनी 19 ऑक्टोबरला जुलै-सप्टेंबर तिमाहीचा निकाल घोषित करणार आहे.









