नवी दिल्ली
एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी नेस्ले इंडियाला मार्चला संपलेल्या तिमाहीत 594 कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्यावर समाधान मानावे लागले आहे. सदरचा नफा हा मागच्या वर्षाच्या समान अवधीच्या तुलनेत नाममात्र 1 टक्के इतका अधिक आहे. वर्षाअगोदर समान अवधीत कंपनीने 602 कोटी रुपये इतका निव्वळ नफा प्राप्त केला होता. वर्षाच्या आधारावर कंपनीने 4002 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे.









