आसिफ शेख, संदीप जोराची चमक, दुसऱ्या टी-20 मध्ये विंडीजवर 90 धावांनी मात
वृत्तसंस्था/ शारजाह
नेपाळ क्रिकेट संघाने इतिहास रचला असून कसोटी खेळणाऱ्या वेस्ट इंडिजला टी-20 द्विपक्षीय मालिकेत पहिल्यांदाच पराभूत करून दाखवले आहे. शनिवारी मालिकेच्या पहिल्या सामन्यात 19 धावांनी विजय मिळवल्यानंतर, नेपाळने मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात 90 धावांनी दणदणीत विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
पूर्ण सदस्य देशाविऊद्ध नेपाळचा हा पहिलाच मालिका विजय होता आणि पुढील महिन्यात होण्राया आयसीसी पुऊष टा-20 विश्वचषकासाठीच्या आशिया-पॅसिफिक प्रादेशिक अंतिम फेरीपूर्वी संघाला भरपूर आत्मविश्वास मिळाला आहे. तिथे ते पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन संघांपैकी एक असतील.
सलामीवीर आसिफ शेख (नाबाद 68) आणि मधल्या फळीतील फलंदाज संदीप जोरा (63) यांनी चौथ्या गड्यासाठी 100 धावांची भागीदारी केली आणि त्यामुळे नेपाळला 20 षटकांत 6 बाद 173 धावा करता आल्या. त्यानंतर मोहम्मद आदिल आलमने चार बळी घेऊन वेस्ट इंडिज संघाच डाव केवळ 83 धावांतच संपविला. हा सहसदस्य देशाच्या संघाने पूर्ण सदस्य संघावर नोंदवलेला सर्वांत मोठा विजय असून नेपाळचा कर्णधार रोहित पौडेल या निकालाने साहजिकच उत्साहित झाला.
‘आम्हाला मालिका उच्च पातळीवर संपवायची आहे. प्रेरणा क्लीन स्वीप पूर्ण करण्याची आहे. पण त्यासाठी आम्हाला पुन्हा सुऊवात करावी लागेल. आम्हाला ही गती पात्रता फेरीत घेऊन जायची आहे आणि आम्हाला 2026 च्या विश्वचषकासाठी पात्र व्हायचे आहे’, असे तो म्हणाला. मालिकेचा तिसरा सामनाही शारजा येथे होणार आहे.
संक्षिप्त धावफलक : नेपाळ 20 षटकांत 6 बाद 173 : आसिफ शेख 47 चेंडूत नाबाद 68, संदीप जोरा 39 चेंडूत 63. विंडीज 17.1 षटकांत सर्व बाद 83 : जेसन होल्डर 21, मोहम्मद आदिल आलम 4-24.









