10 मे पासून भारत-चीन सीमा 72 तासांसाठी सील करणार
काठमांडू / वृत्तसंस्था
13 मे रोजी होणाऱया स्थानिक निवडणुकांपूर्वी नेपाळ सरकारने भारत आणि चीनसोबतच्या सीमा 72 तासांसाठी सील करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने सरकारला 10 मे ते 13 मे दरम्यान सीमारेषा बंद करण्याचे आवाहन केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी भारत आणि चीनच्या सीमेवर असलेल्या जिल्हय़ांच्या संबंधित जिल्हा प्रशासन कार्यालयांना निर्देश जारी करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर निवडणुकीच्या दिवशी बचाव आणि मदत उड्डाणे वगळता सर्व देशांतर्गत विमानसेवा बंद राहणार आहेत, असे नेपाळच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ते फणींद्र मणी पोखरेल यांनी सांगितले. नेपाळची भारताशी सुमारे 1,880 किमी आणि चीनशी सुमारे 1,414 किमी लांबीची सीमा आहे.









