देवरुख :
देवऊख–रत्नागिरी मार्गावरील निवे बुद्रुक नागझरी येथे बोलेरो गाडीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मिलन जसबीर बोहरा (29, मूळ रा. नेपाळ, सध्या रा. सन्मित्रनगर रत्नागिरी) या नेपाळी तऊणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी बेलेरो चालक नितीन कृष्णा मोहिते (रा. तुळसणी बौद्धवाडी) याच्यावर देवऊख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मिलन बोहरा हा कामानिमित्त रत्नागिरी येथे वास्तव्याला होते. सोमवारी तो बजाज पल्सर मोटारसायकल (एमएच-08, एए-1299) घेवून देवऊख येथे भावाला सोडून रत्नागिरीच्या दिशने निघाला होता.
त्यावेळी नितीन मोहिते हा बोलेरो पिकअप (एमएच-08, डब्ल्यु 4759) घेवून रत्नागिरीहून देवऊखच्या दिशेने येत होता. सायंकाळी 7.30 वाजता निवे बुद्रुक येथे बेलेरोची दुचाकीला जोरदार धडक बसली. दुचाकीचे नुकसान होवून मिलन बोहरा याला गंभीर दुखापत झाली. त्याला तत्काळ देवऊख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय सूत्रांनी तपासणी करून मिलन याला मृत घोषित केले. मंगळवारी दुपारी मिलन याच्या शवाचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव करीत आहेत. मिलन याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.








