प्रतिनिधी/रत्नागिरी
तालुक्यातील खंडाळा येथे सॅनिटायझर प्राशन केल्याने नेपाळी महिलेचा मृत्यू झाल़ा. ही घटना बुधवारी सायंकाळी 5 च्या सुमारास घडल़ी. तुलसीदेवी पदम लामा (27, रा. खंडाळा, मुळ कैलाली नेपाळ) असे मृत महिलेचे नाव आह़े. या घटनेची नोंद जयगड पोलीस ठाण्यात करण्यात आल़ी.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. 12 ऑक्टोबर 2022 रोजी तुलसीदेवी हिने कॅनमधील सॅनिटायझर पाणी समजून प्राशन केल़े. यावेळी तिचा उलट्या व चक्कर येवू लागल्याने उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल करण्यात आल़े. उपचारादरम्यान तुलसीदेवी हिचा मृत्यू झाल़ा. या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार धातकर पुढील तपास करत आहेत़