ऑनलाईन टीम/तरुण भारत
ट्रिपला बाहेर जायचं म्हटल की तयारी ही आलीचं. अगदी ठिकाण ठरवण्यापासून ते कपडे कोणते घालायचे याचा विचार आपण करतो. मात्र काहीवेळा आपले बजेट कोलमडते आणि आयत्यावेळी जाणे रद्द होते. पण जर तुम्ही काही टिप्स आणि युक्त्या आजमावल्या तर तुम्ही देशातच नव्हे तर परदेशातच ट्रीपला (Tourism) जाऊ शकता. तुम्हाला भारताच्या जवळील ठिकाणांना ही भेट देता येईल. यासाठी जादा पैसे ही लागणार नाही. आज तुम्हाला आम्ही कमी पैशात नेपाळ (Nepal) टूर कशी करता येईल हे सांगणार आहोत.

नेपाळला पोहोचण्याचा हा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग म्हणजे उत्तर प्रदेशातील गोरखपूर. गोरखपूर(Gorakhpur) ते नेपाळ हे अंतर २४८ किमी आहे. यासाठी तुम्ही दिल्लीपासून (Delhi) उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात जावा. तेथून गोरखपूर बस पकडा. तुम्ही 5 ते 7 तासात याठिकाणी पोहोचाल.

नेपाळला पोहोचल्यानंतर महागड्या हॉटेलमध्ये राहण्याऐवजी स्थानिक गेस्ट हाऊस किंवा कॉटेजमध्ये मुक्काम करा. येथे तुम्हाला ५०० रुपयांमध्ये सहज खोल्या मिळतील.

नेपाळला वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देण्यासाठी टॅक्सी, कॅब घेण्याऐवजी सार्वजनिक वाहतूक वापरा. ते तुम्हाला स्वस्तात मिळेल. तसेच स्थानिक वाहतुकीसह नेपाळचे सौंदर्य पाहण्यात तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळेल. या मार्गांनी नेपाळमध्ये प्रवास केल्यास कमी खर्चात नेपाळच्या खोऱ्यांचा आनंद लुटता येईल.

नेपाळ प्रवासा दरम्यान महागड्या रेस्टॉरंटऐवजी तुम्ही स्थानिक हाॅटेलमध्ये खाण्याची सोय करा. इथे तुम्हाला स्वस्तात जेवण मिळेल. एका दिवसात 1000 रुपया पर्यंत कसा खर्च करता येईल ते पाहा. शक्यतो तेथिल पारंपरिक पदार्थ आणि स्ट्रीट फूड खायला विसरू नका. हे पण खूप चवदार असतात.









